शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन सुरळीत पार पडेल - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 24, 2014 13:07 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २४ - संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात होत असून हे अधिवेशन सुरळीत पार पडेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.  देशातील जनतेने आमच्यावर देशाची जबाबदारी सोपवली असून सरकार व संसदेतील लोकांनी मिळून देश पुढे नेण्याचा प्रयत्न करूया असा संदेश त्यांनी दिला. शांतपणे विचार करून देशहिताचे काम करू असेही मोदींनी सांगितले. संसदेचे हे अधिवेशन परिणामकारक ठरेल व त्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विमा क्षेत्रात अधिक विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारे आणि दीर्घकाळापासून रखडलेले विमा विधेयक तसेच वस्तू व सेवाकर विधेयक सरकारच्या अग्रकमावर आहेत़ कोळसा वटहुकूम आणि वस्त्रोद्योग राष्ट्रीयीकरणासंदर्भातील वटहुकुमाची जागा घेणारी विधेयके पारित करणे, हीसुद्धा सरकारची प्राथमिकता आहे. आजपासून २३ डिसेंबरपर्यंत चालणा-या या अधिवेशनात ३९ विधेयके सादर करण्यासाठी, विचार करण्यासाठी वा पारित करण्यासाठी मांडली जाऊ शकतात, असे संकेत सरकारने दिले आहेत. 
तर योजना आयोग संपुष्टात आणण्याची प्रस्तावित योजना, विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावर सरकारने केलेले कथित घूमजाव आदी मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची योजना आहे. 
दरम्यान दिवंगत माजी सदस्यांना तसेच आज पहाटे निधन झालेले माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहांचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.