नोकरांनी केला मालकाचा विश्वासघात

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:05+5:302014-12-25T22:41:05+5:30

नागपूर : मालकाचा विश्वासघात करून नोकरांनी गोदामातील पावणेदोन लाखांचे ऑईल चोरून नेले. दोन महिन्यापूर्वीच्या या घटनेचा आता उलगडा झाला. विजय लांडगे (बेला), कुणाल झोडे (सोनबानगर), नीलेश चहांदे आणि राजकुमार कापसे (दोन्ही रा. टेकडी वाडी) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व घनपाल शंकररावजी उके (वय ४६, रा. जवाहर नगर, भंडारा) यांच्याकडे कामाला होते. उके यांचे वाडी, खडगाव मार्गावर गोदाम आहे. या गोदामात ठेवलेले गल्फ ऑईलचे डबे उपरोक्त आरोपींनी चोरून नेले. उके यांच्या तक्रारीनुसार चोरलेल्या मालाची किंमत १ लाख, ७१ हजार रुपये आहे. वाडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

The servants betrayed the owner's betrayal | नोकरांनी केला मालकाचा विश्वासघात

नोकरांनी केला मालकाचा विश्वासघात

गपूर : मालकाचा विश्वासघात करून नोकरांनी गोदामातील पावणेदोन लाखांचे ऑईल चोरून नेले. दोन महिन्यापूर्वीच्या या घटनेचा आता उलगडा झाला. विजय लांडगे (बेला), कुणाल झोडे (सोनबानगर), नीलेश चहांदे आणि राजकुमार कापसे (दोन्ही रा. टेकडी वाडी) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व घनपाल शंकररावजी उके (वय ४६, रा. जवाहर नगर, भंडारा) यांच्याकडे कामाला होते. उके यांचे वाडी, खडगाव मार्गावर गोदाम आहे. या गोदामात ठेवलेले गल्फ ऑईलचे डबे उपरोक्त आरोपींनी चोरून नेले. उके यांच्या तक्रारीनुसार चोरलेल्या मालाची किंमत १ लाख, ७१ हजार रुपये आहे. वाडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
-----

Web Title: The servants betrayed the owner's betrayal