शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी वेगळ्या रांगा

By admin | Updated: November 15, 2016 07:51 IST

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सर्वसामान्य लोकांचे झालेले हाल लक्षात घेत केंद्र सरकारला अत्यावश्यक ठिकाणी

नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सर्वसामान्य लोकांचे झालेले हाल लक्षात घेत केंद्र सरकारला अत्यावश्यक ठिकाणी ह्या नोटा स्वीकारण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवावी लागली. रुग्णालये, पेट्रोल पंप, टोलनाके आणि रेल्वे स्टेशन, विमान प्रवास यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येतील.येत्या काही दिवसांत सर्वत्र पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांता दास यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोमवारी दिली. दास म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी गोंधळून वा घाबरून जाण्याचे कारण नाही. रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध आहे. फक्त वितरणात अडचणी येत असून, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसांत सुधारेल.पोस्ट आॅफिसांत अधिकाधिक रोख उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जनतेचे हाल लक्षात घेत, तेथील बँका व पोस्टातील रोख रकमेच्या पुरवठ्यातही वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक विशेष पथक तयार करीत आहे. नव्या रकमेच्या आणि आकाराच्या नोटा एटीएममधून सहज मिळाव्यात, यासाठी एटीएमच्या रचनेत करण्यात येत असलेले तांत्रिक बदल पुढच्या काही दिवसांत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थ सचिव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना बँका, एटीएम वा पोस्ट आॅफिसमधून पैसे काढणे सोपे व्हावे, यासाठी तिथे वेगळ्या रांगा लावण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.