शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सेनेत संघटनात्मक फेरबदल सावंत यांचा भार हलका तुमाने यांच्याकडे भंडारा, गोंदिया: कन्हेरे सहसंपर्कप्रमुख

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

नागपूर : शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले असून पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांची भंडारा आणि गोंदिया जिल्‘ाचे संपर्कप्रमुख म्हणून तर किशोर कन्हेरे यांची गडचिरोली व नागपूरचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

नागपूर : शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले असून पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांची भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून तर किशोर कन्हेरे यांची गडचिरोली व नागपूरचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
राज्यात सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेने पक्षबांधणीवर लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेनेच्या मंत्र्यांनी जिल्हावार दौरे केले. त्यानंतरच्या टप्प्यात संपर्क व सहसंपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवीन नियुक्त्या करताना मंत्रिपद सांभाळणारे डॉ. दीपक सावंत यांच्यावरील संघटनात्मक कामाचा भार हलका करण्यात आला आहे. त्यांच्याकडे पूर्वी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे फक्त नागपूर शहर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. उर्वरित चार जिल्ह्यांपैकी भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांची जबाबदारी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याची जबाबदारी हिंगणघाटचे माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी नागपूरचे किशोर कन्हेरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे नागपूर शहर सहसंपर्क प्रमुख पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. कन्हेरे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते. त्यांना आता शहर सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली. पुढील दोन वर्षात नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर कन्हेरे यांना देण्यात आलेली नवीन जबाबदारी महत्त्वाची ठरते. गुरुवारी त्यांनी डॉ. दीपक सावंत यांची रविभवन येथे भेट घेतली. (प्रतिनिधी)