शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार वापसीत आता वैज्ञानिकही

By admin | Updated: October 30, 2015 01:34 IST

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलले आहे

नवी दिल्ली : देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलले आहे. रालोआ सरकारने देशात हिंदू धर्मीय हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न चालविल्याचा थेट आरोप करीत प्रसिद्ध वैज्ञानिक पुष्पमित्र भार्गव यांनी गुरुवारी पुढील आठवड्यात पद्मभूषण पुरस्कार परत करीत असल्याची घोषणा केली. शिवाय सरकारी अविवेकाचा तीव्र निषेध करणारे निवेदन लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिकांसह ५० पेक्षा जास्त इतिहासकारांनी गुरुवारी केले.अशी चिंता व्यक्त करणाऱ्या वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये पद्मभूषण विजेते अशोक सेन, पी. बलराम आदींचा तर समावेश आहे. तर रोमिला थापर, इरफान हबीब, के.एन. पन्नीकर आणि मृदुला मुखर्जी आदी नामवंतांसह एकूण ५३ इतिहासकारांच्या वतीने ‘सहमत’ ने संयुक्त निवेदन जारी केले आहे.हैदराबाद येथे हैदराबादेतील सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक ८७ वर्षीय वैज्ञानिक पुष्पमित्र भार्गव यांनी १९८६ मध्ये मिळालेला पद्मभूषण किताब परत करण्याचे जाहीर करताना देशातील वातावरणाकडे लक्ष वेधले. महत्त्वाच्या पदांवर रा.स्व.संघाशी संलग्न लोकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. भाजपा ही रा.स्व. संघाची राजकीय आघाडी आहे. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) संचालकांच्या बैठकीला संघाच्या लोकांनी हजेरी लावावी असे इतिहासात कधीही घडले नव्हते, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)