केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 05:34 IST2026-05-18T05:33:43+5:302026-05-18T05:34:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : केरळचे नवनियुक्त मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी रविवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची ...

Satheeshan's 'ultra modern' formula in Kerala! 14 out of 20 ministers are new faces, oath-taking ceremony to be held today | केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार

केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : केरळचे नवनियुक्त मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी रविवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन आपल्या २० सदस्यीय मंत्रिमंडळाची यादी सुपूर्द केली. सोमवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सतीशन यांनी नव्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये जाहीर केली. यंदाच्या मंत्रिमंडळात तब्बल १४ जण पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेणार असून, यात दोन महिला आणि अनुसूचित जाती समुदायाच्या दोन सदस्यांचा समावेश करून सामाजिक समतोल साधण्यात आला आहे. 
 
सतीशन यांनी सांगितले की, संयुक्त लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांशी सविस्तर चर्चा करून प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणे विचारात घेऊनच ही यादी अंतिम करण्यात आली आहे.

अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा मेळ
सतीशन यांच्या मंत्रिमंडळात माजी मंत्री रमेश चेन्निथला, के. मुरलीधरण, ए. पी. अनिल कुमार आणि केपीसीसी प्रमुख सनी जोसेफ या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय, इंडियन युनियन मुस्लीम लीगचे पी. के. कुन्हालीकुट्टी, आरएसपीचे शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ आणि केरळ काँग्रेस (जॅकब)चे अनूप जॅकब हे जुने अनुभवी चेहरेही मंत्री बनणार आहेत. 

दिग्गज नेत्यांची उपस्थिती
सोमवारी होणाऱ्या या भव्य शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर, भाकपाचे बिनॉय विश्वम, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे सतीशन यांनी सांगितले.

नवीन चेहऱ्यांचा समावेश
मंत्रिमंडळात येणाऱ्या १४ नव्या चेहऱ्यांमध्ये सी. पी. जॉन तसेच आययूएमएलचे एन. शम्सुद्दीन, के. एम. शाजी, पी. के. बशीर आणि व्ही. ई. अब्दुल गफूर यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून पी. सी. विष्णूनाथ, रोजी एम. जॉन, बिंदू कृष्णा, टी. सिद्दीकी, के. ए. तुलसी आणि ओ. जे. जनीश हे तरुण व नवे चेहरे पहिल्यांदाच मंत्रीपदाची धुरा सांभाळतील.

Web Title : केरल में सतीशन का 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्मूला: नए चेहरे छाए।

Web Summary : केरल के नए मंत्रिमंडल में वी. डी. सतीशन ने 14 नए मंत्रियों को शामिल किया है, जो अनुभव और नए दृष्टिकोणों को संतुलित करते हैं। मंत्रिमंडल में महिलाओं और अनुसूचित जाति के सदस्यों को शामिल किया गया है, जिसका उद्देश्य सामाजिक सद्भाव है। शपथ ग्रहण समारोह में कई नेता शामिल होंगे।

Web Title : Kerala's Satheesan unveils 'Ultra Modern' cabinet: Fresh faces dominate.

Web Summary : Kerala's new cabinet, led by V. D. Satheesan, features 14 new ministers, balancing experience with fresh perspectives. The cabinet includes women and members of Scheduled Castes, aiming for social harmony. The swearing-in ceremony will be attended by prominent leaders.