शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
5
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
6
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
7
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
8
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
9
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
10
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
12
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
13
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
14
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
15
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
16
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
17
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
18
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
19
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
20
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:34 IST

मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे संजय राऊत..महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून राऊत चर्चेचा केंद्रबिंदु बनले. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आजतागायत संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि राज्याच्या राजकारणात आरोपांचा धुरळा असं समीकरण बनले. मात्र हेच संजय राऊत आता पुढील काही दिवस सक्रीय राजकारणापासून दूर राहणार आहेत. 

राऊतांनी स्वत: याबाबत पत्रक काढत माहिती दिली असून त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राऊतांच्या पोस्टची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊतांचे पोस्ट रिट्विट करून त्यांना लवकर बरे व्हा असं म्हटलं आहे. मोदी म्हणाले की,  संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं त्यांनी म्हटलं. त्यावर राऊतांनीही पंतप्रधानांचे आभार मानले. 

काय म्हणाले संजय राऊत?

आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटासाठी चिंताजनक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून अनेक आव्हानांचा सामना करत असलेल्या शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असणारे संजय राऊत २ महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut's health deteriorates; PM Modi inquires about his well-being.

Web Summary : Sanjay Raut will be away from active politics for two months due to health issues. Prime Minister Narendra Modi inquired about his health and wished him a speedy recovery. Raut acknowledged Modi's well-wishes. This news is concerning for the Thackeray group, especially with upcoming elections.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे