शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज १

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

शासनाकडून भांडवली मूल्यावर कर आकारणीचा निर्णय : सुधारित कर आकारणीमुळे शहरालगतच्या ग्रामपंचायतींना फायदा; विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा

शासनाकडून भांडवली मूल्यावर कर आकारणीचा निर्णय : सुधारित कर आकारणीमुळे शहरालगतच्या ग्रामपंचायतींना फायदा; विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा
ग्रामपंचायती होणार मालामाल
शेख महेमूद तमीज
वाळूज महानगर : राज्य शासनाच्या वतीने भांडवली मूल्यावर कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला असून, या सुधारित कर आकारणीमुळे शहरालगतच्या ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार असून, विकासकामांनाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.
संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीच्या वतीने सरसकट मालमत्ताधारकांकडून क्षेत्रफळानुसार आधारित कर आकारणी करण्यात येत होती. या कर आकारणी पद्धतीमुळे शहरालगत असलेल्या गावांत, तसेच ग्रामीण परिसरातील गावातही एकसमान पद्धतीने ग्रामपंचायतींकडून कराची वसुली करण्यात येत होती. मात्र, शहरालगत असलेल्या गावातील व ग्रामीण परिसरातील जागा व मालमत्तेच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे जुनी कर आकारणीची पद्धत सदोष असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सुधारित कर आकारणी करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. शासनाने ३१ डिसेंबर २०१५ रोजी अधिसूचना जारी करून आता ग्रामपंचायतींना सुधारित कर प्रणालीनुसार कर आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. या पद्धतीनुसार इमारतीचे व खुल्या जागेचे भांडवली मूल्य निश्चित करण्यात येणार आहे. इमारतीचे क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मूल्यदर, बांधकामाच्या प्रकारानुसार कर वसुली, इमारतीचा घसारा व वापरानुसार भारांक या बाबी विचारात घेऊन कर आकारणी केली जाणार आहे. प्रथम सहा महिन्यांत संपूर्ण कराचा भरणा करणार्‍या खातेदारांस ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. वर्ष संपेपर्यंत ग्रामपंचायत कराचा भरणा न केल्यास ५ टक्के दंड आकारला जाईल. कर आकारणीमध्ये एक हजार रुपयांच्या भांडवली मूल्यावर किमान व कमाल दर शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना दर निश्चित करून मिळकतींना कर लावावा लागेल. पूर्वी ग्रामसभेत ठराव करून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मनमानी कर वसुली करीत होते. आता या सुधारित कर आकारणी पद्धतीने ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांना चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यावर निर्बंध येणार असून, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भरघोस वाढ होणार आहे.
(जोड आहे)