शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

रुद्रगौडाचा मृतदेह बेळगावजवळ जंगलात सापडला?

By admin | Updated: October 29, 2015 00:09 IST

पोलिसांकडून दुजोरा नाही: सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरील वृत्ताने खळबळ

पोलिसांकडून दुजोरा नाही: सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरील वृत्ताने खळबळफोटो28कलबुर्गी किलर स्केच28 डेड बॉडीबेळगाव : जेष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकर्‍याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला. हा मृतदेह संशयित मारेकरी सनातनचा बेपत्ता साधक रुद्रगौडा पाटील याचाच असल्याचे वृत्त सोशल मिडियावर फिरु लागले.काही वाहिन्यांनीही ते देण्यास सुरवात केल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली. दिवसभर चर्चेचा विषय झाला . पण पोलिसांनी किंवा इतर तपास यंत्नणांनी हा मृतदेह रुद्रगौडाचा असल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.उत्तर विभागाचे पोलीस महासंचालक उमेशकुमार यांनी देखील मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे सांगितले .18 ऑक्टोबर रोजी खानापूर जवळील माणिकवाडी येथील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता . पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर विच्छेदन करून तो मृतदेह बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. ओळख न पटल्यामुळे त्या मृतदेहाचे मंगळवारी पोलिसांनी दफन केले . जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्न खानापूर येथील एका व्यक्तीने मोबाईलवर काढले होते . तो मृतदेह आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जाहीर केलेले मारेकर्‍याचे रेखाचित्र यात साम्य असल्याचे छायाचित्न काढलेल्या व्यक्तीच्या ध्यानात आले . नंतर त्याने मृतदेहाचे छायाचित्न आणि कलबुर्गी यांच्या मारेकर्‍याचे पोलिसांनी जाहीर केलेले रेखाचित्न सोशल मिडीयावर पोस्ट केले . त्यानंतर काही वाहिन्यांनी कलबुर्र्गी यांच्या मारेकर्‍याच्या चेहर्‍याशी अज्ञात मृतदेहाचे साम्य असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरु केल्यावर सापडलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा मडगाव येथे 2009 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बेपत्ता असलेल्या रुद्रगौडा पाटीलचा असावा अशी देखील चर्चा रंगू लागली .चौकटवयातील फरकअज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे वय 25 ते 30 दरम्यान असण्याची शक्यता असून रुद्रगौडाचे वय सध्या 40 किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे . त्यामुळे हा मृतदेह रुद्रगौडाचा असण्याची शक्यता कमी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.चौकटमृतदेह पुन्हा बाहेर काढणारकर्नाटक सीआयडीचे एक पथक आज गुरुवारी जिलत दाखल होत आहे. या पथकाकडून खानापूर पोलिसांनी दफन केलेला तो मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचा पुन्हा पंचनामा केला जाण्याची शक्यता आहे.