RSS, भाजपा देशवासियांवर विचारधारा थोपवत आहे - राहुल गांधी

By Admin | Updated: March 4, 2016 15:04 IST2016-03-04T14:59:09+5:302016-03-04T15:04:52+5:30

देशांत प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा आदर झाला पाहिजे, मात्र आरएसएस आणि भाजपाची लोक देशात प्रत्येकावर आपली विचारधारा थोपवत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे

RSS, BJP is imposing ideology on the people - Rahul Gandhi | RSS, भाजपा देशवासियांवर विचारधारा थोपवत आहे - राहुल गांधी

RSS, भाजपा देशवासियांवर विचारधारा थोपवत आहे - राहुल गांधी

>ऑनलाइन लोकमत - 
आसाम, दि. ४ - देशांत प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा आदर झाला पाहिजे, मात्र आरएसएस आणि भाजपाची लोक देशात प्रत्येकावर आपली विचारधारा थोपवत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आसाममध्ये रॅलीदरम्यान ते बोलत होते.  भाजपाची लोक जिथे जातात तिथे एका भारतीयाला दुस-या भारतीयाविरोधात लढवतात, यांची हीच विचारसरणी आहे असंही राहुल गांधी बोलले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या एक तासाच्या भाषणात माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची भाषण वाचून दाखवली मात्र उत्तर काहीच दिलं नाही. अरुण जेटली यांनी फेअर अॅण्ड लव्हली स्कीम आणली आहे, त्या माध्यमातून भारतातील चोर लोक आपला काळा पैसा सफेद करत आहेत. मी पंतप्रधानांना बोललो तुम्ही काळा पैसा परत आणणार होतात मात्र तुमच्या मंत्र्याने ही कोणती स्कीम लाँच केली असं राहुल गांधी बोलले आहेत.
 

Web Title: RSS, BJP is imposing ideology on the people - Rahul Gandhi