शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरातच पुन्हा घेरले चौकास ! अहमदपुरातील समस्या : राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमणे पूर्ववत अहमदपूर : वाहतुकीची कोंडी फुटावी आणि वाहनचालकांसह पादचार्‍यांना ये- जा करताना

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़

अहमदपूर हे जिल्‘ात तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्‍यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़
शहरातील शासकीय विश्रामगृहापासून शिवाजी चौकापर्यंत संपूर्णपणे उतार आहे़ या ठिकाणी ऑटो, अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबत आहेत़ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या जागेवरही या वाहनधारकांनी आपला ठिय्या मांडला आहे़ परिणामी, शहरात अपघताचे प्रमाण वाढले आहे़
गेल्या महिनाभरापूर्वी शहरातील स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, पोलिस प्रशासन आणि नगर पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती़ तसेच शिवाजी चौकातील अतिक्रमणेही काढण्यात आली़ परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच राहिली़ परिणामी, महिनाभराच्या कालावधीत पुन्हा शहरातील सर्वच ठिकाणची अतिक्रमणे वाढली आहेत़ नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी शहरातील अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे़
तसेच सध्या शहरात सर्वाधिक वाहतुकीचे तीन केंद्र असून त्यात शिवाजी चौक, महात्मा बसवेश्वर चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहेत़ या ठिकाणी सिग्नल उभारावेत, अशमी मागणी होत आहे़ अतिक्रमणधारक हातगाडीवाले आणि भाजीपाले विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देऊन सामान्यांची अडचण दूर करण्याची मागणी होत आहे़
चौकट़़़
लवकरच अतिक्रमणे काढणाऱ़़
शहरातील शिवाजी चौकातील अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत़ लवकरच ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी व्ही़ डी़ हराळे यांनी सांगितले़