रोटरॅक्टचा अनाथ मुलांसमवेत रक्षाबंधन सोहळा

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30

सोलापूर :

RotorKat's Rakshabandhan ceremony with orphaned children | रोटरॅक्टचा अनाथ मुलांसमवेत रक्षाबंधन सोहळा

रोटरॅक्टचा अनाथ मुलांसमवेत रक्षाबंधन सोहळा

लापूर :
रोटरॅक्ट क्लब ऑफ सोलापूरच्या नॉर्थ-ईस्टने मोहोळ येथील भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानमधील अनाथ मुलांसमवेत रक्षाबंधन सोहळा साजरा करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
मला शिकता आले नाही म्हणून मला भविष्य नव्हते, तरीही या अनाथ मुलांचे भविष्य घडविण्याचे मी ठरविले आहे, असे मत ज्ञानेश्वर भोसले यांनी व्यक्त केले. क्लबचे अध्यक्ष शकीब खान यांनी मुलांना उद्देशून बोलताना म्हणाले, तुम्ही एकटे आहात याचा विचार करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. क्लबच्या वतीने मुलांना पुस्तके, पेन देऊन आणि खाऊ वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमात प्रथमेश साळुंके, मंदार जालवादी, रोनक शिरशाळ, विजय कालदीप, प्रणित येलमेळी, स्वाती उकरंडे, चैतन्य औटी, प्रियंका गायकवाड, यदुनाथ गुर्जल आदींनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन सृष्टी मोरे यांनी केले तर यदुनाथ गुर्जल यांनी आभार मानले. यावेळी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो ओळी
रोटरॅक्ट क्लब ऑफ सोलापूरच्या नॉर्थ-ईस्टच्या वतीने मोहोळ येथील आदिवासी व भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानमधील अनाथ मुलांसमवेत रक्षाबंधन सोहळा साजरा केला. त्याप्रसंगी मुलांसमवेत ज्ञानेश्वर भोसले, मंदार जालवादी, प्रथमेश साळुंके, यदुनाथ गुर्जल आदी.

Web Title: RotorKat's Rakshabandhan ceremony with orphaned children