90 लाखांच्या 5 किलो सोन्याची लूट करून दरोडेखोरांचा पोबारा

By Admin | Updated: December 26, 2016 17:01 IST2016-12-26T17:01:26+5:302016-12-26T17:01:26+5:30

मुथूट फायनान्स कंपनीतील अधिका-यांना बंदुकीचा धाक दाखवून तीन अज्ञात दरोडेखोरांनी 90 लाखांच्या 5 किलो सोन्याची लूट करून पोबारा केला

Robbery robbed of 5 kg gold worth 9 lakh | 90 लाखांच्या 5 किलो सोन्याची लूट करून दरोडेखोरांचा पोबारा

90 लाखांच्या 5 किलो सोन्याची लूट करून दरोडेखोरांचा पोबारा

ऑनलाइन लोकमत

गुजरात, दि. 26 - राजकोट येथील धोराजी शहरात मुथूट फायनान्स कंपनीतील अधिका-यांना बंदुकीचा धाक दाखवून तीन अज्ञात दरोडेखोरांनी 90 लाखांच्या 5 किलो सोन्याची लूट करून पोबारा केला आहे. तीन अज्ञात दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स कंपनीच्या शाखेत प्रवेश केला. बंदुकीचा धाक दाखवून 4.8 किलो सोने चोरून पळ काढला, अशी माहिती राजकोट (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अँट्रिप सूद यांनी दिली आहे.
दरम्यान, तीन दरोडेखोर बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत लूट करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. पोलिसांनी आता दरोडेखोरांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. चोरांच्या शोधासाठी शहरातील सर्व टोलनाके सील करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती सूद यांनी दिली आहे. तीन दरोडेखोरांनी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून अधिका-याकडून मुथूट फायनान्स शाखेतील लॉकर उघडं करून घेतले आणि सोनं घेऊन पसार झाल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

Web Title: Robbery robbed of 5 kg gold worth 9 lakh