शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१२९१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत सुधारित पैसेवारी : यावल, रावेर व भुसावळ तालुक्यातील ३३ नवीन गावांचा समावेश

By admin | Updated: October 31, 2015 22:43 IST

जळगाव : जिल्‘ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांपैकी तब्बल १२५८ गावांची हंगामी (नजर) पैसेवारी ५० पैशांचा आत आल्याने ही गावे यापूर्वीच दुष्काळी जाहीर झाली आहे. आता जिल्हा प्रशासनातर्फे सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या गावांची संख्या १२९१ पर्यंत पोहचली आहे.

जळगाव : जिल्‘ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांपैकी तब्बल १२५८ गावांची हंगामी (नजर) पैसेवारी ५० पैशांचा आत आल्याने ही गावे यापूर्वीच दुष्काळी जाहीर झाली आहे. आता जिल्हा प्रशासनातर्फे सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या गावांची संख्या १२९१ पर्यंत पोहचली आहे.

यावल व रावेर तालुक्यांचा समावेश
जिल्हा प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर रोजी हंगामी (नजर) पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यात जिल्‘ातील जळगाव, धरणगाव, जामनेर, एरंडोल, बोदवड, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर व पारोळा या तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी ही ५० पैश्याच्या आत लावण्यात आली होती. रावेर, यावल तालुक्यातील सर्व तर चोपडा तालुक्यातील ३० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त होती. सुधारित पैसेवारी दरम्यान रावेर तालुक्यातील १९ गावांचा, यावल तालुक्यातील १० गावांचा तर भुसावळ तालुक्यातील ४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला.

२१० गावांची पैसेवारी ५० पैशांवर
हंगामी पैसेवारीच्या वेळी महसूल प्रशासनाने १५ सप्टेंबर रोजी १२५८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत घोषित केली होती. त्यात आता ३३ नव्या गावांची भर पडली आहे. तर यावल तालुक्यातील ७४, रावेर तालुक्यातील १०२, मुक्ताईनगर तालुक्यातील ४ व चोपडा तालुक्यातील ३० अशा एकुण २१० गावांची पैसेवारी ही ५० पैशांचे वर आहे.