शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णू गँगचे पुनरागमन - अनुपम खेर

By admin | Updated: March 1, 2017 17:02 IST

विरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तर, विद्या बालन नंतर आता या वादात अनुपम खेर यांनी उडी घेत नव्या वादाला वळण दिले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणाच्या वादात अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले आहे. सोशल मीडियावर याचे रणकंद सुरु झाले आहे. विरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तर, विद्या बालन नंतर आता या वादात अनुपम खेर यांनी उडी घेत नव्या वादाला वळण दिले आहे. वेगळा मुद्दा घेऊन असहिष्णूतेची गँग परत आली आहे. त्यांच्या घोषणा वेगळ्या असल्या तरी चेहरे तेच आहेत असे एक ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे. ट्विटवर हॅश-टॅग करताना त्यांनी #Intolerance #AwardWapsi #Emergency #DemonitisationDisaster #BharatKeTukde या शब्दांचा वापर केला आहे. आणखी एक ट्विट करताना त्यांनी देशभक्तीचा नारा लगवला आहे. देशभक्तीच्या प्रखर भावनेवर जितके प्रश्न उपस्थित केले जातात, तितकी देशभक्ती वाढत जाते, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. अनुपम खेर यांना भाजपच्या जवळचे मानले जातात. गेल्या वर्षी जेएनयूमधील संघर्षातही त्यांनी उडी घेतली होती. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण या भाजपच्या खासदार आहेत.

 

गुरमेहरचे समर्थन करणा-यांना पाकिस्तानबद्दल कळवळा असून, त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य अनिल वीज यांनी केले आहे.दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरमेहर कौरच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दल आणि तिला अभाविपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिच्या महाविद्यालयानेही गुरमेहरच्या कृतीचे समर्थन केले आहे.आपण कोणाला घाबरत नाही. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधातील (अभाविप) मोहीम थांबवत आहोत, असे गुरमेहरने म्हटले. काल ती आपल्या जालंधर या गावी गेली. तेथील माजी सैनिकांच्या संघटनेने गुरमेहरला दिल्या जाणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही तिच्यामागे उभे आहोत, असे म्हटले आहे. तिच्या आजोबांनीही आपण गुरमेहरच्या मागे ठामपणे उभे राहू, असे म्हटले.