शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दाढी अन् पगडी घातल्यानं शीख तरुणाला मॅनेजरनं Restaurantमध्ये दिला नाही प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 17:45 IST

शीख समुदायातील लोकांना रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या बऱ्याचशा घटना परदेशात घडत असतात.

ठळक मुद्देदिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये शीख फॅशन डिझायनरला प्रवेश करण्यास मनाई केली आहे. परम साहिब नावाच्या एका फॅशन डिझायनरच्या धर्म आणि पेहरावावर  रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आक्षेप घेत प्रवेश नाकारला मी सरदार असल्यानंच मला प्रवेश दिला नाही

नवी दिल्लीः शीख समुदायातील लोकांना रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या बऱ्याचशा घटना परदेशात घडत असतात. परंतु आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही असे प्रकार समोर आले आहेत. दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये शीख फॅशन डिझायनरला प्रवेश करण्यास मनाई केली आहे.परम साहिब नावाच्या एका फॅशन डिझायनरच्या धर्म आणि पेहरावावर  रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आक्षेप घेत प्रवेश नाकारला आहे. त्यानंतर परम यानं याची माहिती स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली. पाहता पाहताच त्यांची पोस्ट व्हायरल झाली. या विषयावरून गदारोळ झाल्यानंतर रेस्टॉरंट मालकाचे झोपेतून डोळे उघडले आणि त्यानंतर त्यानं माफी मागितली. त्याचबरोबर आरोपी मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. मी सरदार असल्यानंच मला प्रवेश दिला नाहीपरमनं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितलं की, मला आणि माझ्या मित्रांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला नाही. कारण मी सरदार आहे. माझी दाढी, पेहरावावर रेस्टॉरंट मॅनेजरला आक्षेप होता. त्याचदरम्यान काऊंटरवरील एकानं परमबरोबर असलेल्या महिलेशी छेडछाडही केली. काऊंटरवरच्या मॅनेजरनं सांगितलं की, आम्ही शीख लोकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देत नाही.  रेस्टॉरंट मालकानं कबूल केली चूक, मॅनेजरला नोकरीवरून काढलंया प्रकाराची रेस्टॉरंटच्या मालकानं गंभीर दखल घेतली असून, परम या शीख तरुणाचा अपमान केलेल्या मॅनेजरला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच परम यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर रेस्टॉरंटनं दिलेला माफीनामाही पोस्ट केला आहे.