शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मजबूत करण्याचा संकल्प

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

फोटो आहे...

फोटो आहे...
काँग्रेसचा १२९ वा स्थापना दिवस : एकोप्याने कामाला लागणार
नागपूर : भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी ६५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. निवडणुकीत जय-पराजय हा होणारच, कार्यक र्त्यांनी निराश न होता काँग्रेसला मजबूत करण्याचा संकल्प पक्षाच्या १२९ व्या वर्धापन दिनी करण्यात आला. शहर काँग्रेस कमिटीतर्फे देवडिया काँग्रेस भवन येथे रविवारी या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विनोद गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कृष्णकुमार पांडे, प्रदेश सचिव तानाजी वनवे, माजी आमदार अशोक धवड, एस.क्यू.जमा, यादवराव देवगडे, माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन, काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक आदी उपस्थित होते.
निवडणुकीत अच्छे दिन चे आश्वासन देऊ न भाजपने सत्ता मिळवली. परंतु त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण होणार नाही. पराभवामुळे निराश न होता पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन विकास ठाकरे यांनी केले.
निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपणार नाही. जगात सर्वात हा जुना पक्ष आहे . यापूर्वीही पराभव झाला होता. कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन सतीश चतुर्वेदी यांनी केले. यावेळी विलास मुत्तेमवार यांनीही मार्गदर्शन केले.
प्रारंभी मुत्तेमवार व ठाकरे यांनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी आदींच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले. संचालन प्रदेश सचिव संदेश सिंगलकर यांनी तर आभार रामगोविंद खोब्रागडे यांनी मानले.
शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजू व्यास, महासचिव डॉ. गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, उमाकांत अग्निहोत्री, डॉ. अभिजित वंजारी, विजय बाभरे, संजय दुबे, रत्नाकर जयपूरकर, राजकुमार मोटघरे, परमेश्वर राऊ त, नितीन गौर, दीपक वानखेडे, संजय सरायकर, अनिल शर्मा, किशोर जिचकार, मालिनी खोब्रागडे, पुरुषोत्तम लोणारे, प्रवीण आगरे, दिनेश बानाबाकोडे, नगरसेवक गुड्डू तिवारी, तनवरी अहमद, सरस्वती सलामे, शीला मोहोड, हर्षला साबळे, प्रेरणा कापसे, राजश्री पन्नासे, निमिशा शिर्के, सिंधू उईके, देवा उसरे, यशवंत कुंभलकर, मनोज साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)