शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत मंदिर आणि मशिदीची प्रतिकृती आमने-सामने

By admin | Updated: December 26, 2015 02:15 IST

अयोध्येत श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीची प्रतिकृती आमनेसामने उभी करून प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये व्यूहरचना आखण्यात आघाडी घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

अयोध्या : अयोध्येत श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीची प्रतिकृती आमनेसामने उभी करून प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये व्यूहरचना आखण्यात आघाडी घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मुस्लिमांच्या एका गटाने बुधवारी सायंकाळी बाबरी मशिदीची छोटी प्रतिकृती प्रदशर््िात केल्यानंतर अयोध्येतील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आणि गुप्तचर संस्थांनीही परिस्थितीवर पाळत ठेवायला सुरुवात केली आहे.काही लोकांनी अयोध्येतील काझियाना भागात बाबरी मशिदीची ही थर्मोकोलची प्रतिकृती ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा भाग वादग्रस्त जागेशेजारी आहे.विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराची प्रतिकृती तयार करून ती शिलांवर कलाकुसर करण्याच्या कार्यशाळेत ठेवली आहे. त्याचा प्रत्युत्तर म्हणून बाबरी मशीद कृती समितीशी संबंधित मुस्लिमांच्या एका गटाने बाबरी मशिदीची ही प्रतिकृती तयार करून विहिंपप्रमाणेच दगड मागविण्याची घोषणा केली आहे. विहिंप दररोज आपली मंदिराची प्रतिकृती दाखवित असतील तर आम्ही बाबरी मशिदीची प्रतिकृती का दाखवू नये, असा सवाल हाजी महबूब यांनी केला. शिला पूजनावरून दररोज वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न विहिंप करीत आहे. आता केवळ मशिदीची प्रतिकृती मिरवणुकीत सामील करण्याचाच प्रयत्न करण्यात आला. ही प्रतिकृती अद्याप सार्वजनिक स्थळी ठेवण्यात आलेली नाही. परंतु सरकारने विहिंपच्या या कार्यशाळेवर अंकुश घातला नाही तर बाबरी मशीद कृती समितीही शिला आणून त्यावर कलाकुसर करण्याचे काम सुरू करण्यास मोकळी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली पाहिजे, असे महबूब यांनी सांगितले.  (वृत्तसंस्था)