शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर रेमडेसीवीर औषध प्रभावी नाही, उपचारातून लवकरच हटविण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 07:43 IST

डॉ. डीएस. राणा हे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख असून प्लाझ्मा उपचारपद्धतीनंतर वगळण्यात आल्यानंतर रेमडेसीवीरबाबत त्यांनी हे विधान केलं आहे. कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देडॉ. डीएस. राणा हे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख असून प्लाझ्मा उपचारपद्धतीनंतर वगळण्यात आल्यानंतर रेमडेसीवीरबाबत त्यांनी हे विधान केलं आहे. कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली.

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा पद्धतीचा वापर बंद करण्याच्या सूचविण्यात आले आहे. त्यानंतर, आता रेमडेसीवीर इंजेक्शनचाही वापर कोरोनाबाधित व्यक्तींच्या उपचारपद्धतीतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार करताना रेमेडेसीवीर इंजेक्शनचा मोठा फायदा झाल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे, लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे डॉ. डीए. राना यांनी म्हटले आहे. 

डॉ. डीएस. राणा हे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख असून प्लाझ्मा उपचारपद्धतीनंतर वगळण्यात आल्यानंतर रेमडेसीवीरबाबत त्यांनी हे विधान केलं आहे. कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये याचा अयोग्यपद्धतीने वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. आता, रेमडेसीवीरसंदर्भातही लवकरच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारपद्धतीकडे बारकाईने पाहिल्यास, रेमेडेसीवीर इंजेक्शनामुळे रुग्णांना बरं होण्यासाठी मोठा फायदा झाल्याचा कुठेही सिद्ध झाले नाही. हे इंजेक्शन प्रभावी ठरल्यांचा कुठेही वस्तूनिष्ठ पुरावा नाही. त्यामुळे, लवकरच हे इंजेक्शनही कोविडच्या उपचारपद्धतीतून वगळण्यात येऊ शकते, असे डॉ. राणा यांनी म्हटलंय. 

दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी केवळ तीनच औषधे महत्त्वाची व प्रभावशाली बनून काम करत आहेत. कोरोना महामारीवरील उपायांसाठी सातत्याने नवनवीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न वैद्यकीय यंत्रणा करत आहे. आम्ही सर्वचजण यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत, असेही राणा यांनी म्हटलंय. 

प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन

प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे आणि पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही देशभरातील रुग्णालयात याचा उपयोग तर्कहीनपणे केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर