राष्ट्रपतींकडून सहगल यांच्या निधनाबद्दल शोक

By Admin | Updated: July 12, 2014 01:47 IST2014-07-12T01:47:49+5:302014-07-12T01:47:49+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री जोहरा सहगल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जोहरा सहगल एक महान अभिनेत्री होत्या.

Regarding the death of Sehgal by the President | राष्ट्रपतींकडून सहगल यांच्या निधनाबद्दल शोक

राष्ट्रपतींकडून सहगल यांच्या निधनाबद्दल शोक

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री जोहरा सहगल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जोहरा सहगल एक महान अभिनेत्री होत्या. त्या सशक्त रंगमंच आणि टीव्ही कलाकार होत्या. त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि अद्भुत अभिनय क्षमतेने बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या असंख्य दर्शकांचे मनोरंजन केले, असे राष्ट्रपतींनी सहगल यांच्या मुलीला पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे. 
सहगल यांची भज्जी ऑन द बीच, चीनी कम, हम दिल दे चुके सनम, सावरिया आदी चित्रपटातील अभिनयासाठी आठवण केली जाईल. चित्रपटातील महान योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींनी सहगल यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली व ईश्वर त्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी सदिच्छा व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Regarding the death of Sehgal by the President