शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाच्या अनुदानासाठी निधी पडतोय कमी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

३ कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित

३ कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित
भोकर : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत भोकर पंचायत समितीने ग्रामस्वच्छतेची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली असून गत साडेतीन महिन्यांत ४ हजार ५२० शौचालय बांधून वापरास सुरुवात करण्यात आली आहे़ पण यापैकी ३ हजार २७८ कुटुंबांना मात्र अद्यापपर्यंत अनुदानाचा लाभ झाला नाही़ यामुळे या मोहिमेला खीळ बसते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे़
भोकर तालुक्यात १९ हजार ९६२ कुटुंब आहेत़ नोव्हेंबर २०१४ पूर्वी तालुक्यातील ६ हजार १८६ कुटुंबांनी पूर्वीच शौचालय बांधून घेतले होते़ यामुळे पंचायत समितीसमोर १३ हजार ७७६ कुुटुंबांच्या घरी शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट होते़ या उद्दिष्टाच्या दिशेने पंचायत समिती पावले टाकत गत साडेतीन महिन्यांत ४ हजार ५२० कुटुंबाच्या घरी शौचालय उभारण्यात व ती वापरात आणण्यात यशस्वी झाली़ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून ते वापरात आले की शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला बारा हजार रुपये अनुदान देते़ नव्याने उभारलेल्या ४ हजार ५२० कुटुंबापैकी १ हजार २४२ कुटुंबांना अनुदान देण्यात आले आहे़ यासाठी जवळपास १ कोटी ५० लाख रुपये खर्च झाले आहेत़ उर्वरित ३ हजार २७८ कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले असले तरी यांना मात्र अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही़
शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून वापरायला सुरु केलेल्या कुटुंबांना अनुदान देण्यास विलंब होत असल्याने मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या या ग्रामस्वच्छता अभियानाला खीळ बसते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे़
भोकर तालुक्यातील स्वच्छता अभियान मागील साडेतीन महिन्यांपासून चांगलीच गतिमान झाली असली तरी संपूर्ण तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी आणखी ९ हजार २५६ कुटुंबाच्या घरी नव्याने शौचालय उभारण्याच्या कामाला गती घ्यावी लागणार आहे आणि यासाठी आणखी ११ कोटी १० लाख ७२ हजारांचे अनुदानाचे पंचायत समितीला नियोजन करणे गरजेचे आहे़