शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाचा फरक टाळण्यासाठी शक्कल २५ टक्केच पगार देण्याची शिफारस : मनपा कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी

By admin | Updated: March 18, 2016 00:12 IST

जळगाव : मनपा कर्मचार्‍यांनी सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळण्याची मागणी लावून धरताच मनपाच्या अधिकार्‍यांनी याबाबतच्या टिपणीवर कर्मचार्‍यांना केवळ २५ टक्केच पगार देण्याची शिफारस करणारा शेरा मारल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने तसेच प्रभाग समिती क्र.२च्या सभापतींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जळगाव : मनपा कर्मचार्‍यांनी सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळण्याची मागणी लावून धरताच मनपाच्या अधिकार्‍यांनी याबाबतच्या टिपणीवर कर्मचार्‍यांना केवळ २५ टक्केच पगार देण्याची शिफारस करणारा शेरा मारल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने तसेच प्रभाग समिती क्र.२च्या सभापतींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनपाची परिस्थिती बिकट असल्याने व एप्रिलपासून दोन-तीन महिने वसुलीदेखील फारशी येणार नसल्याने पगार करणे अवघड आहे. मात्र त्यावर केवळ २५ टक्के पगार अदा करावेत. उर्वरित ७५ टक्के वेतन मनपाकडे राखून ठेवून ते नंतर अदा करावे, अशी अजब शिफारस करण्यात आली आहे.
संपाचा इशारा
शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत असे झाल्यास संपाचा इशारा दिला आहे. ८ तास खाली मान घालून काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार कपात करायचा आणि खाजगी कामासाठी सरकारी वाहने वापरणार्‍या व पडदे लावून चिरीमिरी घेणार्‍या अधिकार्‍यांनी पूर्ण पगार घ्यायचा हे सहन केले जाणार नाही, असा इशारा शिवराम पाटील, कॉ.अनिल नाटेकर, कॉ.विजय पवार यांनी दिला आहे.
सभापतींचाही इशारा
प्रभाग समिती क्र.२च्या सभापती कंचन सनकत यांनीही मनपा कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असून त्यांना वेतनही वेळेवर मिळत नाही. त्यात जर ७५ टक्के वेतन कपात केल्यास त्यांना घरखर्च भागविणे अशक्य होईल. त्याऐवजी प्रशासनातील वर्ग १च्या अधिकार्‍यांचे ७५ टक्के वेतन कपात करावे, अशी मागणी केली आहे. कर्मचार्‍यांची वेतन कपात केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
---- इन्फो---
आयुक्तांचे कानावर हात
या संदर्भात कोणतीही फाईल, अथवा प्रस्ताव आपल्यासमोर आलेला नसल्याचे सांगत आयुक्तांनी याप्रकाराबाबत कानावर हात ठेवले. उपायुक्तांनीही फाईल आलेली आहे, मात्र वाचली नसल्याचे सांगत या विषयावर बोलण्याचे टाळले.
---- इन्फो---
अधिकार्‍यांनी स्वत:पासून सुरुवात करावी
शिफारस करणारे अधिकारी हे राज्य शासनाकडून आले आहेत. त्यांनी आधी स्वत:पासून २५ टक्के वेतन घेण्याची सुरुवात करावी. नंतर कर्मचार्‍यांच्या वेतन कपातीचा विषय मांडावा, अशी तीव्र भावना कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.