हरियाणात बंडाचे वारे; ऊर्जामंत्र्यांचा राजीनामा

By Admin | Updated: July 30, 2014 00:52 IST2014-07-30T00:52:25+5:302014-07-30T00:52:25+5:30

आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसप्रणीत हरियाणा सरकारमध्ये बंडाचे वारे वाहत आह़े

Rebellion in Haryana; Energy minister resigns | हरियाणात बंडाचे वारे; ऊर्जामंत्र्यांचा राजीनामा

हरियाणात बंडाचे वारे; ऊर्जामंत्र्यांचा राजीनामा

चंदीगड : आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसप्रणीत हरियाणा सरकारमध्ये बंडाचे वारे वाहत आह़े राज्याचे ऊर्जामंत्री अजय यादव यांनी मख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याविरुद्ध बंडाचे निशान फडकवत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आह़े लोकसभेतील पराभवानंतरही नेतृत्वाने कुठलाही धडा घेतलेला नाही, असा ठपकाही त्यांनी ठेवला आह़े
नियुक्त्या, विविध आयोग तसेच घटनात्मक संस्थांवरील भरती वा सदस्य नेमणुकीत पक्षपात झाल्याचा आरोप करीत यादव यांनी आज मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला़ पदाचा राजीनामा दिला असला तरी ते काँग्रेसमध्ये कायम राहणार आहेत़ एका वृत्तसंस्थेशी बोलताना खुद्द यादव यांनी ही माहिती दिली़ मी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याकडे राजीनामा पाठवला आह़े मात्र सोनिया गांधी माङया नेत्या आहेत तोर्पयत मी काँग्रेसमध्ये कायम राहणार आहे, असे त्यांनी सांगितल़े याचवेळी राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी टीका केली़  (वृत्तसंस्था)

 

Web Title: Rebellion in Haryana; Energy minister resigns