वाचक पत्र : चुकीचा पायंडा

By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:12+5:302015-07-12T21:58:12+5:30

मालवीय दारूकांडातील बळींची संख्या आता १०२ झाली आहे़ कर्ताच मनुष्य गेल्यामुळे लेकराबाळांनी काय खावे ही चिंता नातेवाईकांना लागली आहे़ सहानुभूतीने सरकारने १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे़ जनतेच्या पैशाचा विनियोग अशा पद्धतीने करावा का याबद्दल चर्चा चालू आहे़ माझ्या मते हे चूक आहे़ तात्पुरती मलमप˜ी करण्याऐवजी गुजरातसारखी कडक दारूबंदी का केली जात नाही ती करावी़

Reader Letter: Wrong Legislation | वाचक पत्र : चुकीचा पायंडा

वाचक पत्र : चुकीचा पायंडा

लवीय दारूकांडातील बळींची संख्या आता १०२ झाली आहे़ कर्ताच मनुष्य गेल्यामुळे लेकराबाळांनी काय खावे ही चिंता नातेवाईकांना लागली आहे़ सहानुभूतीने सरकारने १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे़ जनतेच्या पैशाचा विनियोग अशा पद्धतीने करावा का याबद्दल चर्चा चालू आहे़ माझ्या मते हे चूक आहे़ तात्पुरती मलमप˜ी करण्याऐवजी गुजरातसारखी कडक दारूबंदी का केली जात नाही ती करावी़
आपण गेल्यावर नातेवाईकांना पैसे मिळणार आहेत़ हे दारू पिणारे दुप्पट वेगाने दारू पिणार नाहीत हे कशावरूऩ माझ्या मते संपूर्ण दारूबंदी हाच उपाय योग्य आहे़
आप्पासाहेब चव्हाण- पंढरपूऱ
---------
वृत्तपत्रात बातमी वाचली़ पेटवून देऊन खून, एकाची निर्दोष मुक्तता, गुन्हा दाखल मग त्यावेळी पुरावे असल्याशिवाय गुन्हा दाखल झाला का़ मग तरीही आरोपींना निर्दोष का सोडले जाते़ याचेच आश्चर्य वाटते़ आज कितीही गुन्हे करा़़़फक्त एक लेबल लावायचे सबळ पुराव्याअभावी आणि गुन्हेगाराला सहीसलामत सोडवायचे़ याला काहीच अर्थ नाही मग अन्यायाविरोधात महिलांना न्याय कसा मिळणाऱ हे गुन्हेगार निर्दोष कसे काय सोडले जातात़ गुन्हे करून निर्दोष सोडून परत एखादा खून करायला मोकळेच राहतात़ तरी गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे़ तरच अन्यायार्थींना न्याय मिळेल़ खरे इथे निर्दोष सुटतील पण वरच्या कोर्टात सुटतील का़ कुठे तरी न्याय मिळायलाच हवा नाही का़
-सीमा अवसेकर
पंढरपूर

Web Title: Reader Letter: Wrong Legislation