शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपविरुद्ध बोलणाऱ्या तरुणीला बलात्काराची धमकी

By admin | Updated: February 28, 2017 04:22 IST

भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडणाऱ्या गुरमेहर कौरला बलात्काराची धमकी देण्यात आल्यामुळे दिल्ली विद्यापीठातील (डीयू) वाद चिघळला आहे.

नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडणाऱ्या गुरमेहर कौरला बलात्काराची धमकी देण्यात आल्यामुळे दिल्ली विद्यापीठातील (डीयू) वाद चिघळला आहे. भाजपा नेत्यांनी गुरमेहरला लक्ष्य केल्यानंतर विरोधी नेते तिच्या बचावासाठी धावले आहेत, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनी गुरमेहरचे मन कोणी प्रदूषित केले, असा सवाल केला, तर काही भाजपा नेत्यांनी या तरुणीपेक्षा दाऊद इब्राहिम बरा, या पातळीवर जात टीका केली.अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. डीयूत शिकत असलेली गुरमेहर कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे. दरम्यान, गुरमेहरने तक्रार दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. गेल्या बुधवारी डीयूमध्ये उमर खालीद आणि शहला रशीद यांना बोलावले होते. त्यातून अभाविप व एआयएसए यांच्यात वाद होऊन विद्यापीठात राडा झाला होता. निरपराध विद्यार्थ्यांना मारहाण, तसेच विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्याचे प्रकार घडले होते. यामुळे संतप्त गुरमेहरने सोशल मीडियावर ‘मी अभाविपला घाबरत नाही’ ही मोहीम सुरू केली. तिच्या या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, भाजपा नेत्यांनी तिला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बलात्काराच्या धमक्या दिल्याची तक्रार गुरमेहरने सोमवारी दिल्ली महिला आयोगाकडे केली. त्यानंतर, आयोगाने गुरमेहरला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना दिल्या. गुरमेहरने तिच्या तक्रारीत पुरावे म्हणून बलात्काराच्या धमकीचे स्क्रीनशॉट दिले आहेत. सेहवागने केली टिंगलगुरमेहरने गेल्या आठवड्यात फेसबुकवर, ‘मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे,’ हा मेसेज टाकताच, वर्गमित्र आणि इतर विद्यार्थ्यांनी तिची पोस्ट शेअर केली, पण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आदींनी तिची ‘राजकीय प्यादे’ अशी संभावना केली. सेहवागने तर तिची टिंगलच केली.त्यावर ती म्हणाली, ‘त्यांनी माझी देशभक्तीची कल्पना समजलेली नाही. शिवाय ही राजकीय चळवळ नाही. हा मुद्दा विद्यार्थ्यांशी आणि आमचा परिसर हिंसक धमक्यांपासून मुक्त करण्याशी संबंधित आहे. कोणीही कोणाला बलात्काराची धमकी देऊ शकत नाही.’ दाऊद बरा : भाजपा नेतेभाजपाचे खासदार प्रताप सिन्हा यांनी, ‘गुरमेहरपेक्षा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरा,’ या भाषेत तिच्यावर टीका केली. >काँग्रेसचा भाजपावर हल्लाभाजपा नेत्यांनी कारगिल शहिदाच्या मुलीविरुद्ध वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केली. रिजिजू आणि सिन्हा यांची विधाने फॅसिस्ट मानसिकतेचे परिपूर्ण उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचे विचार कदाचित तुम्हाला पटणार नाहीत. म्हणून मग धमक्या देणे योग्य नाही. हे प्रकार लोकशाहीत बसणारे नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.