शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक....

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
रामटेक : शहरात संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा विविध ठिकाणी श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडला. शीतलवाडी येथील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करण्यात आले. छप्पनभोग लावण्यात आले. महानैवेद्य व महाआरती करण्यात आली. अभिनव कलादर्शच्यावतीने भक्तिसंगीताचा कार्यक्रम तसेच रवींद्र केदार महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या गडपायरी परिसरात असलेल्या लोटांगण महाराज मंदिरातही गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात पार पडला. यावेळी भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. श्रीसंत गजानन महाराज रामटेकला आले असता ज्या नेवरेंच्या घरी थांबले होते तेथे दरवर्षीप्रमाणे प्रकट दिन आयोजित करण्यात आला. शेकडो भाविकांनी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत महाप्रसादाचा लाभ घेतला. रामाळेश्वर वॉर्डातील खोलकुटे परिवारातर्फे सामूहिक प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कळमेश्वरात पालखी यात्रा
कळमेशवर : श्रीसंत गजानन महाराज उत्सव समितीच्यावतीने गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त शहरात पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले. उत्सवात सचिन काळे महाराज यांच्या गोपालकाल्याचे कीर्तन पार पडले. गजानन महाराज मंदिरातून पालखी यात्रा काढण्यात आली. गण गण गणात बोतेच्या गजरात भाविकांनी श्रींचा जयघोष केला. पालखी यात्रेदरम्यान विविध संस्थांतर्फे पाणी, नाश्ता व बुंदी वाटप करण्यात आले. उत्सवास मधुकर लोखंडे, काशीनाथ चिमूरकर, डॉ. विजय देशमुख, अरविंद बोडखे, अशोक बंड, चंद्रशेखर श्रीखंडे, राघवेंद्र कुरळकर आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)