रामगोपाल यादव सन्मानाने सपात

By Admin | Updated: November 18, 2016 01:00 IST2016-11-18T01:00:57+5:302016-11-18T01:00:57+5:30

समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे चुलत बंधू आणि ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांना गुरुवारी पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला.

Ramgopal Yadav honors | रामगोपाल यादव सन्मानाने सपात

रामगोपाल यादव सन्मानाने सपात

लखनौ : समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे चुलत बंधू आणि ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांना गुरुवारी पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. काही आठवड्यांपूर्वी त्यांची पक्षातून काढण्यात आले होते.
रामगोपाल यांना त्यांची पूर्वीची पदेही बहाल करण्यात आली आहेत. गच्छंतीपूर्वी ते पक्षाचे राज्यसभेतील नेते, पक्ष प्रवक्ते, राष्ट्रीय सरचिटणीस तसेच संसदीय पक्ष सदस्य होते. पक्षात पुन्हा प्रवेश देण्याच्या निर्णयाचे रामगोपाल यांनी स्वागत केले. आपण कधीही पक्षहिताविरुद्ध काम केले नाही, असे ते म्हणाले. त्यांना २३ आॅक्टोबर रोजी सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Ramgopal Yadav honors