शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर व्हावे!

By admin | Updated: December 5, 2014 01:57 IST

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे, असे सांगून राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातून आपण बाहेर पडत

लखनौ : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे, असे सांगून राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातून आपण बाहेर पडत असल्याचे या खटल्यातील प्रमुख वादी हाशिम अन्सारी यांनी बुधवारी जाहीर केले. बाबरी मशीद विध्वंसाला २२ वर्षे पूर्ण होत असतानाच वादी अन्सारी यांनी खटल्यातून अंग काढण्याचा निर्णय घेतला आहे, हे विशेष.‘या मुद्याचे राजकारण करण्यात आले आहे आणि आता हा मुद्दा धार्मिक राहिलेला नाही. या खटल्यातून माघार घेण्याची माझी इच्छा आहे. माझी ही इच्छा मी लेखी स्वरूपात सर्वोच्च न्यायालयाला कळविणार आहे. ६ डिसेंबरला मी ‘यौमे गम’ (शोक दिवस) कार्यक्रमात भाग घेणार नाही. त्या दिवशी मी आपल्या घरीच राहीन,’ असे अन्सारी म्हणाले.‘आजम खानसारखे राजकारणी हा मुद्दा जटिल बनविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे मी खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे. रामलल्लाची तंबूतून सुटका झाल्याचे आणि त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्यात आल्याचे मला बघायचे आहे,’ असे अन्सारी यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद पाडणाऱ्या आरोपींना शिक्षा करण्याचे अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले तर आपण या मुद्यावर शांततापूर्ण वाटाघाटीसाठी त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असेही अन्सारी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकत्र बसून चर्चा करण्यास तयार आहे. परंतु मोदींनी या मुद्यावर चर्चा सुरू होण्याआधी बाबरी मशीद विध्वंस खटला जलद गती न्यायालयापुढे आणावा, अशी माझी इच्छा आहे.’मागील २२ वर्षांपासून लखनौ आणि रायबरेली येथील विशेष सीबीआय न्यायालयात बाबरी मशीद विध्वंसातील आरोपींविरुद्ध खटला सुरू आहे. हे न्याय नाकारणेच आहे. ठराविक वेळेच्या आत आरोपींचा शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मोदींनी दिले तर शांततापूर्ण चर्चा करण्यास आमची तयारी आहे, असेही अन्सारी म्हणाले. (वृत्तसंस्था)