शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

"२४ तासांत जाहीर माफी मागा", भाजपा उमेदवाराकडून शशी थरूरांना मानहानीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 2:16 PM

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडुकीच्या प्रचारादरम्यान शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्याबाबत विधान केले होते.  

Rajeev Chandrasekhar Defamation Notice:  लोकसभा निवडणुकीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रचाराचा धुरळा उडत आहे. यादरम्यान, केरळमधील तिरुवनंतपुरममधील भाजपाचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. लोकसभेचा गैरफायदा घेण्यासाठी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडुकीच्या प्रचारादरम्यान शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्याबाबत विधान केले होते.  

शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा आणि ख्रिश्चन समुदायामध्ये खोटे पसरवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजीव चंद्रशेखर यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. यासोबतच शशी थरूर यांनी आपल्यावर केलेले आरोप मागे घ्यावेत आणि त्याबद्दल जाहीर माफी मागावी, यासाठी राजीव चंद्रशेखर यांनी २४ तासांचा अवधी त्यांना दिला आहे. 

शशी थरूर यांनी एका मुलाखतीत राजीव चंद्रशेखर यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांची प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आले आहेत. शशी थरूर यांनी यासाठी बिनशर्त जाहीर माफी मागावी आणि आपली विधाने मागे घ्यावीत. भविष्यात अशी खोटी विधाने करणे आणि अफवा पसरवणे थांबवावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण?लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केरळमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा आणि ख्रिश्चन समुदायाविरोधात खोटे पसरवल्याचा आरोप केला होता. मुलाखतीचा हा भाग सहा एप्रिल रोजी प्रसारित झाला होता. ते म्हणाले होते, "राजीव चंद्रशेखर यांनी एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक नेत्यांना पैसे देऊ केले आहेत." यावर प्रतिक्रिया देताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरthiruvananthapuram-pcतिरुवनंतपुरमkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४