Join us

Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 2:34 PM

PM Narendra Modi invested in Post Office Scheme: नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यात त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा खुलासा केला. पाहूया कोणत्या सरकारी योजनेत त्यांनी केलीये गुंतवणूक.

PM Narendra Modi invested in Post Office Scheme: नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यात त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा खुलासा केला. पंतप्रधानांनी आपल्या मालमत्तेतील गुंतवणुकीबद्दलही दिलेल्या माहितीत पोस्ट ऑफिस योजनेचाही उल्लेख केला आहे. ही योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate- NSC). पंतप्रधानांनी या स्कीममध्ये ९.१२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. एनएससी ही एक डिपॉझिट स्कीम आहे ज्यामध्ये रक्कम ५ वर्षांसाठी गुंतविली जाते. सध्या या योजनेवर ७.७ टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावाही मिळू शकतो. जाणून घेऊ या योजनेशी संबंधित खास गोष्टी. 

कोण करू शकतो गुंतवणूक? 

कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये जॉइंट अकाऊंटची सुविधाही आहे. दोन ते तीन जण मिळून संयुक्त खातं उघडू शकतात. पालक अल्पवयीन मुलाच्या नावावर गुंतवणूक करू शकतात, तर १० वर्षापर्यंतची मुले त्यांच्या नावावर एनएससी खरेदी करू शकतात. आपण एकाच वेळी अनेक एनएससी खाती देखील उघडू शकतो. एनएससीमध्ये कमीत कमी १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता. या योजनेवर ८० सी अंतर्गत कर लाभही मिळतो.

 

मोदींइतक्या गुंतवणुकीवर किती फायदा? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेत ९,१२,००० रुपयांची गुंतवणूक केली आहे. जर तुम्ही तेवढीच रक्कम गुंतवली तर सध्याच्या व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात केवळ व्याजातून ४,०९,५१९ रुपये मिळू शकतात. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १३,२१,५१९ रुपये मिळतील. जर तुम्ही ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याज म्हणून ४,०४,१३० रुपये मिळतील आणि १३,०४,१३० रुपये ही तुमची मॅच्युरिटी रक्कम असेल. 

१ लाख ते ५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न 

  • १,००,००० च्या गुंतवणुकीवर व्याज ४४,९०३ रुपये आणि मॅच्युरिटीवर रक्कम १,४४,९०३ रुपये असेल.
  • २,००,००० च्या गुंतवणुकीवर व्याज ८९,८०७ रुपये आणि मॅच्युरिटीवर रक्कम २,८९,८०७ रुपये असेल.
  • ३,००,००० च्या गुंतवणुकीवर व्याज १,३४,७१० रुपये आणि मॅच्युरिटीवर रक्कम ४,३४,७१० रुपये असेल.
  • ४,००,००० च्या गुंतवणुकीवर व्याज १,७९,६१४ रुपये आणि मॅच्युरिटीवर रक्कम ५,७९,६१४ रुपये असेल.
  • ५,००,००० च्या गुंतवणुकीवर व्याज २,२४,५१७ रुपये आणि मॅच्युरिटीवर रक्कम ७,२४,५१७ रुपये असेल.
टॅग्स :नरेंद्र मोदीपोस्ट ऑफिसगुंतवणूक