शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

Rajasthan Political Crisis: भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 2:06 PM

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे सायलेंट माडवर

जयपूर: राजस्थानात सुरू असलेला राजकीय सत्तासंघर्ष थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील संघर्ष टोकाला गेला आहे. सरकार स्थिर असल्याचा दावा गेहलोत यांच्याकडून केला जात आहे. तर गेहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा पायलट यांचा दावा आहे. सत्ता संघर्ष सुरू असताना गेहलोत मात्र अतिशय शांत असल्याचं दिसत आहे. गेहलोत यांना सरकार टिकण्याचा विश्वास आहे. यामागे भाजपाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे असल्याचं म्हटलं जात आहे. सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानं राजस्थानातील सत्ता संघर्ष सुरूच आहे. राजस्थानातील भाजपाचे नेतेदेखील सक्रीय झाले आहेत. आमदारांच्या घोडेबाजारावरून दाखल करण्यात आलेला एफआयआर, मुख्यमंत्री गेहलोत यांचे भाजपावरील आरोप यावर वसुंधरा राजे शांत आहेत. त्यांनी शनिवारी आणि रविवारी अवघी दोन ट्विट केली आहेत. मात्र ती राजकारणाशी संबंधित नाहीत. राजस्थानातल्या सत्तासंघर्षावर भाजपाच्या इतर नेत्यांप्रमाणे वसुंधरा राजे कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. यामागे राजकीय गणित असल्याचं राजकीय पंडित सांगतात. गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यामध्ये अतिशय उत्तम राजकीय केमिस्ट्री आहे. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर राजे यांनी त्याविरोधात कोणतीही टीका केलेली नाही. इतकंच नव्हे, तर गेल्या दीड वर्षांत त्या सरकारविरोधात त्या सरकारविरोधात कधीही रस्त्यावर उतरलेल्या नाहीत.गेहलोत सत्तेत आल्यानंतर त्यांनी वसुंधरा यांच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य सचिव डी. बी. गुप्ता यांना पदावरून दूर केलं नाही. याची तक्रार पायलट यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून केली. त्यानंतर गेहलोत यांनी गुप्ता यांना पदावरून हटवलं आणि त्यांची नियुक्ती राजकीय सल्लागारपदी नियुक्ती केली. गुप्ता हे वसुंधरा यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेहलोत अतिशय कसलेले नेते मानले जातात. राजकीय गणित जुळवणं हे त्यांचं कौशल्य मानलं जातं. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcongressकाँग्रेस