शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'तो' हनुमान चालीसा पठण करत होता अन् डॉक्टर काढत होते ट्युमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:29 IST

राजस्थान येथील बीकानेरमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये रूग्ण हनुमान चालीसा पठण करत असतानाच डॉक्टरांनी त्याच्यावरील ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याचे वृत्त समोर आले आहे.

ठळक मुद्देरूग्णाला झाला होता ग्रेड 2चा ब्रेन ट्युमरशस्त्रक्रियेदरम्यान रूग्ण हनुमान चालीसा पठण करत होता डॉक्टरांनी यशस्वीरित्या रूग्णाचा ट्युमर काढला बाहेर

राजस्थान येथील बीकानेरमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये रूग्ण हनुमान चालीसा पठण करत असतानाच डॉक्टरांनी त्याच्यावरील ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, बीकानेरमधील डुंगरगड येथील रहिवासी असलेले एका 30 वर्षीय इसमाला गेल्या काही दिवसांपासून पक्षघाताचे झटके येत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बायॉस्पी केल्यानंतर रूग्णाला ग्रेड 2चा ब्रेन ट्युमर असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. काही वैद्यकीय तपासण्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात न्यूरो सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ.के.के.बन्सल यांनी सांगितले की, रूग्णाच्या डोक्यातील एका भागात ट्युमर होता, यामुळे त्यांना बोलताना अडचणींचा सामना करावा लागत होता. बायॉस्पीमध्ये रुग्णाला ग्रेड 2 ब्रेन ट्युमर असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय, त्यांच्यावरील शस्त्रक्रिया गंभीर स्वरुपाची होती. कारण डोक्यातील ज्या भागामध्ये ट्युमर झाला होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्याची क्षमता जाण्याचीदेखील भीती होती. 

याबाबत डॉ. के.के बन्सल यांनी पुढे असंही सांगितले की, आम्ही अन्य डॉक्टरांशी सल्लामसलत करुन रूग्णाला बेशुद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आमचा हा निर्णय ऐकून सुरुवातीला रूग्ण घाबरला. सुरुवातीला त्यांनी शस्त्रक्रियेस नकार दिला, पण नंतर त्यानं तयारी दर्शवली. शस्त्रक्रियेदरम्यान आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो आणि तो हनुमान चालीसा पठण करत होता. लोकल अ‍ॅनेस्थेशियामुळे वेदना जाणवल्या नाहीशस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाला वेदना होऊ नये, यासाठी लोकल अॅनेस्थेशिया देण्यात आला. पण यामुळे तो बेशुद्ध झाला नाही. डॉ. के.के. बन्सल यांनी सांगितले की, रूग्णाचे हनुमान चालीसा पठण करणं आमच्यासाठीदेखील प्रचंड उपयुक्त ठरले. कारण यामुळे रूग्णाचे लक्ष विचलित झाले नाही आणि डॉक्टरांनाही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडत त्याच्या डोक्यातील ट्युमर बाहेर काढला. शस्त्रक्रियेदरम्यान रूग्ण हनुमान चालीसा पठण करत असल्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानdoctorडॉक्टर