शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:02 IST

२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले.

मेघालयमधील निसर्गरम्य शिलाँगमध्ये सुरु झालेली एक हनिमून ट्रिप एका भयानक हत्येच्या रूपात संपली. इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी २० मे २०२५ रोजी शिलाँगला पोहोचले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांत, २३ मे रोजी एक असा कट रचण्यात आला, ज्याने राजाचा जीव घेतला आणि देशभरात खळबळ माजवली. या गुन्ह्यात आता त्याची पत्नी सोनम हिचेच नाव पुढे आले असून, तीच पतीच्या हत्येच्या कटात सहभागी होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

हत्या कशी घडली?
२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले.

२४ मे रोजी रात्री त्यांची स्कूटी शिलाँगपासून २५ किमी अंतरावर ओसारा हिल्सच्या पार्किंगमध्ये सापडली. २८ मे रोजी जंगलात दोन बॅगा सापडल्या. राजाच्या भावाने या बॅगांची ओळख पटवली. त्याच दिवशी वेसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीतून राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत देहाजवळ सोनमचे कपडे, औषधं, आणि एक रक्ताने माखलेला 'दाओ' (खासी जमातीचा पारंपरिक चाकू) मिळाला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजावर निर्दयपणे हल्ला झाला होता – त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून, चाकूने अनेक वार करण्यात आले होते.

कुणी केला पहिला वार?
तपासाच्या पुढील टप्प्यात समोर आले की, सोनमचे इंदूरमध्येच राहणाऱ्या राज कुशवाह नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी या प्रकरणात राज कुशवाहसह विकी ठाकूर आणि आनंद या दोघांनाही अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हत्या घडवून आणण्याची योजना सोनम आणि राज कुशवाहने एकत्रितपणे आखली होती. यानंतर आनंदने राजावर पहिला वार केला, त्यानंतर इतर आरोपींनी राजाला ठार मारले. या सर्व घटनेचा राज कुशवाह फोनद्वारे पाठपुरावा करत होता.

सोनमचाच सहभाग, आत्मसमर्पणानंतर कबुली!
सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. अखेर ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली. तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की, तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती.

या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. मात्र, सोनमच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला की, ते त्यांच्या मुलीला तिच्या मुलीला जबरदस्तीने गुन्हेगार ठरवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम निर्दोष आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी