राज बब्बर यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

By Admin | Updated: September 9, 2016 13:42 IST2016-09-09T13:42:18+5:302016-09-09T13:42:18+5:30

उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांची अभिनेत्री मुलगी जुही बब्बर उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

Raj Babbar's daughter is likely to get into the election fray | राज बब्बर यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

राज बब्बर यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि.9- उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांची अभिनेत्री मुलगी जुही बब्बर उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणा-या निवडणुकीत जुही दक्षिण आग्राच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते अशी माहिती सुत्रांनी दिली. याबाबत ऑक्टोबर महिन्यात औपचारिक घोषणा होऊ शकते. 
जुहीला राजकारणाची चांगली समज असून यापुर्वी वडिलांसाठी तिने निवडणूक कॅम्पेन केलेलं आहे. जुही निवडणूक लढवणार या बातमीने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे, अशी माहिती कॉग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
जुहीच्या आग्रहाखातरच 2009 मध्ये अभिनेता सलमान खानने फिरोजाबाद लोकसभा पोटनिवडणुकीत राज बब्बर यांचा प्रचार केला होता. त्यावेळी वडिलांच्या विजयात जुहीने महत्वाची भूमिका बजावली होती.  म्हणूनच जुही बब्बरने निवडणूक लढवल्यास त्याचा कॉंग्रेससाठी सकारात्मक परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे.
   
 

Web Title: Raj Babbar's daughter is likely to get into the election fray