शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर उमेदवार उभा करणे हे पक्षांतर नव्हे

By admin | Updated: January 12, 2015 00:47 IST

राज्यसभा निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाच्या आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोर उमेदवार उभा करून त्याचा सक्रियपणे प्रचार करणे हे ‘पक्षांतर’ ठरत नाही

अजित गोगटे, मुंबईराज्यसभा निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाच्या आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोर उमेदवार उभा करून त्याचा सक्रियपणे प्रचार करणे हे ‘पक्षांतर’ ठरत नाही व पक्षांतरबंदी कायद्यान्वये अशा आमदारांचे सदस्यत्व रद्द करता येत नाही, असा महत्त्वाचा निकाल पाटणा उच्च न्यायालयाने दिला आहे.बिहारमधून काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या काही आमदारांनी दोन बंडखोर उमेदवार उभे केले होते. त्यावरून विधानसभेच्या अध्यक्षांनी, पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारून, ग्यानेंद्र कुमार सिंग, रवींद्र राय, नीरज कुमार सिंग आणि राहुल कुमार या चौघांची आमदारकी रद्द केली होती. अध्यक्षांचा हा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द करताना न्या. ज्योती सरन यांनी हा निकाल दिला.राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टात पक्षांतर करणाऱ्या आमदार/ खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे. त्यातील परिच्छेद २ (१) (ए) नुसार एखाद्या सदस्याने स्वत:हून पक्ष सोडला तरी त्याने पक्षांतर केल्याचे मानून त्याचे सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते. या चार आमदारांनी बंडखोर उमेदवार उभे करून त्यांचा सक्रियपणे प्रचार करण्याची जी कृती केली त्यावरून त्यांनी स्वत:हून पक्षत्याग केला, असा अर्थ काढून विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. मात्र अध्यक्षांच्या निर्णयातील हे गृहितक चुकीचे ठरविताना न्या. सरन म्हणतात की, मतभेद हा जिवंत लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे व पक्षांतरबंदी कायद्याच्या दृष्टीने विचार करता प्रत्येक मतभेद पक्षांतर ठरेलच असे नाही. प्राप्त परिस्थितीचा साकल्याने विचार करूनच याचा विचार केला जायला हवा. न्यायालयाने असेही म्हटले की, निवडणुकीत आमदार-मतदारांनी विवेकबुद्धीला स्मरून मतदान करणे हे जर पक्षांतरबंदीच्या संदर्भात निषिद्ध ठरत नसेल तर बंडखोर उमेदवारांचे प्रस्तावक व अनुमोदक बनून त्यांना पाठिंबा देणे हे त्या आमदारांनी विवेकानुसार मतदान करण्याच्या दिशेने टाकलेले केवळ एक पाऊल ठरते. या निवडणुकीत संयुक्त जनता दलाने पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्यासह पवन कुमा वर्मा आणि गुलाम रसूल असे तीन उमेदवार उभे केले होते. उमेदवारांची ही नावे पक्षाच्या संसदीय मंडळाने मंजूर केलेली नव्हती.