शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिटाचं १०० वेटिंग कन्फर्म होतं, पण कधी १० वेटिंग का अडकतं? असं का? ही आहेत तीन कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:33 IST

Indian Railway tickets Booking: वेटिंग तिकीट कन्फर्म करण्यामागे रेल्वेचे काही फॉर्म्युले असतात. तसेच त्या आधारावर एखादी तिकीट कन्फर्म होते तसेच एखादी तिकीट वेटिंगवर राहते.  त्या आधारावर आज आपण १०० पर्यंत वेटिंग असलेलं तिकीट  कधी कधी कन्फर्म होतं आणि १० वेटिंग असलेलं तिकीट कन्फर्म का होत नाही, याचा आपण आढावा घेऊयात.

 सणासुदीच्या काळात, दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसात प्रवासाला जाताना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवणं हे मोठं दिव्य असतं. बऱ्याचदा खूप प्रयत्न केल्यानंतरही आपल्याला रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नसल्याचा अनुभव तुमच्यापैकी अनेकांनी घेतला असेल. त्यातच कधीकधी १००-१२० वेटिंग असलेलं तिकीट काही दिवसांतच वेटिंग कमी होऊन कन्फर्म झाल्याचा तर कधी अवघं ५-१० वेटिंग असलेलं तिकीट शेवटपर्यंत कन्फर्म होत नसल्याचेही तुम्ही पाहिलं, असेल. त्यामुळे काही जण ३० पर्यंत वेटिंग असेल तर तिकीट कन्फर्म होऊ शकतं असे मानतात, तर काहींना १०० पर्यंतची वेटिंग लिस्ट क्लिअर होऊन आपलं तिकीट कन्फर्म होईल असा विश्वास असतो. तर काही जण १० वेटिंग असलं तरी तिकीट कन्फर्म होऊ शकत नाही, असं सांगतात. मात्र वेटिंग तिकीट कन्फर्म करण्यामागे रेल्वेचे काही फॉर्म्युले असतात. तसेच त्या आधारावर एखादी तिकीट कन्फर्म होते तसेच एखादी तिकीट वेटिंगवर राहते.  त्या आधारावर आज आपण १०० पर्यंत वेटिंग असलेलं तिकीट  कधी कधी कन्फर्म होतं आणि १० वेटिंग असलेलं तिकीट कन्फर्म का होत नाही, याचा आपण आढावा घेऊयात.

महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या ट्रेनमध्ये जेवढ्या जागा उपलब्ध असतात, तेवढ्या जागांची तिकिटे रेल्वेला विकायची असतात, असं नाही. रेल्वे केवळ सीट विकत नाही तर सीटची विक्री रेल्वेच्या मार्गाच्या आधारावर करते. म्हणजेच मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या ट्रेनच्या सीट ह्या प्रत्येक स्टेशनसाठी वेगवेगळ्या भागात विभागलेल्या असतात. त्यामुळे एखाद्या ट्रेनमध्ये काही स्टेशनवरून कन्फर्म तिकीट मिळते. तर काही स्टेशनवरून तीच तिकीट वेटिंग असल्याचं दिसतं.

प्रत्येक स्टेशनच्या आधारावर प्रवाशांसाठी सीटचा कोटा निश्चित असतो. त्या आधारावरच प्रवाशांना सीट दिली जाते. याचाच अर्थ तुम्ही कुठल्या स्टेशनवरून तिकीट बुक करता आणि त्या स्टेशनला तिकिटांचा किती कोटा आहे. यावर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणार की नाही हे अवलंबून असते. याशिवाय तुमच्या प्रवासाचं शेवटचं स्टेशन, ट्रेनच्या त्या मार्गावर उपलब्ध असलेल्या जाता, इतर प्रवाशांचं बुकिंग, कोटा लिमिट, कॅन्सलेशन पॅटर्न या बाबीही विचारात घेतल्या जातात.

त्यामुळे जेव्हा लोक म्हणतात कि वेटिंग १०० पर्यंत क्लिअर झाली आहे. मात्र १० वेटिंग का अडलंय, तेव्हा त्याचं उत्तर म्हणजे हा पॅटर्न असतो. सर्वसाधारणपणे वेटिंगचं तिकीट क्लिअर होण्याचे तीन पॅटर्न दिसून येतात. यामधील पहिला फॅक्टर हा त्या मार्गावर असणारी प्रवाशांची मागणी हा असतो.  प्रवाशांची मागणी अधिक असलेल्या मुंबई मडगाव किंवा मुंबई पुणे अशा मार्गांवर कॅन्सलेशनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे कॅन्सलेशन कमी असल्याने वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यताही कमी असते.

तिकीट कन्फर्म होणार की वेटिंगवर राहणार हे ठरवणारा दुसरा फॅक्टर म्हणजे कोटा ब्लॉक. ट्रेनमधील काही जागा व्हीआयपी कोटा, लेडिज कोटा, डिफेन्स कोटा यासाठी आरक्षित असतात. या जागा शेवटी रिलीज होतात. किंवा कधी कधी होत नाहीत. त्यामुळे वेटिंग पुढे सरकत नाही. तिकिट कन्फर्म होणार की नाही हे ठरवणारा तिसरा फॅक्टर म्हणजे चार्ट. चार्ट बनण्यापूर्वी जर अधिक कॅन्सलेशन झालं नाही तर तिकिटाचं वेटिंग तिथेच अडखळून राहतं.

त्याबरोबरच १०० वेटिंग क्लिअर होण्यामागील प्रमुख कारण आहे ते म्हणजे प्रवासाची तारीख आणि बुकिंग यामध्ये असलेला वेळ. याशिवाय मोठ्या प्रमाणावर कॅन्सलेशन झालं. ग्रुप बुकिंग कॅन्सल झालं तर, विशेष कोट्यामधील जागा रिलिज होणं. तसेच प्रवासाची तारीख कमी मागणीची असं, आदी कारणांमुळे बऱ्याचदा खूप वेटिंग असलं तरी तिकीट कन्फर्म होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Why train ticket waiting lists vary: Three key reasons.

Web Summary : Train ticket confirmation depends on route demand, quotas, and cancellations. High demand routes have less chance of confirmation. VIP quotas can block movement. More cancellations before charting increase confirmation probability.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे