राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती, पण नेमका विषय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:37 IST2026-03-15T15:35:27+5:302026-03-15T15:37:16+5:30

Rahul Gandhi Letter To PM Modi: राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना एका वेगळ्या विषयावरून पत्र लिहिले आहे.

rahul gandhi wrote a letter to pm modi gave information on social media but what was the exact topic | राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती, पण नेमका विषय तरी काय?

राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती, पण नेमका विषय तरी काय?

Rahul Gandhi Letter To PM Modi: आताच्या घडीला देशासह जगात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अमेरिका इस्रायल आणि इराण युद्ध थांबताना दिसत नाही. या युद्धाचा मोठा प्रभाव जगातील अनेक देशांवर होत असून, भारतही त्याला अपवाद नाही. या युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष यावरून देशातील भाजपा सरकारवर टीका करत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका लागत आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग येत असून, देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना एका वेगळ्या विषयावरून पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. 

राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती

सामाजिक न्यायासाठी झटणारे महान योद्धा आणि बहुजन चेतनेचे मार्गदर्शक कांशीराम यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित करावे अशी माझी मागणी आहे. हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान कांशीराम आणि लाखो बहुजनांना हक्क सहभाग आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखविणाऱ्या संपूर्ण चळवळीला समर्पित असेल. या मागणीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. या पोस्टसह पत्राचा फोटोही शेअर केला आहे. 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विविध मान्यवरांची भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत विविध गटांकडून मागणी केली जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जाते. तसेच शरद पवार यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी मध्यंतरी करण्यात आली होती. तर, विराट कोहली, नितीश कुमार, नवीन पटनायक यांनाही भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली गेली. यात आता आणखी एका नावाची भर पडल्याचे म्हटले जात आहे.

Web Title : राहुल गांधी ने पीएम मोदी को लिखा पत्र; सोशल मीडिया पर दी जानकारी

Web Summary : राहुल गांधी ने सामाजिक न्याय के योद्धा कांशीराम को भारत रत्न देने की मांग की। उन्होंने पीएम मोदी को पत्र लिखकर इसकी जानकारी दी। कई समूहों ने अन्य नेताओं के लिए भी भारत रत्न की मांग की है।

Web Title : Rahul Gandhi Writes to PM Modi; Shares Information on Social Media

Web Summary : Rahul Gandhi requests Bharat Ratna for Kanshi Ram, a social justice champion. He informed about writing a letter to PM Modi regarding this. Various groups have demanded Bharat Ratna for other leaders too.