अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी वाराणसीत

By Admin | Updated: May 10, 2014 15:29 IST2014-05-10T10:49:47+5:302014-05-10T15:29:25+5:30

वाराणसी मतदारासंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी काँग्रेस उपाध्यक्ष सर्व देशाचे लक्ष लागलेल्या वाराणसीतील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असून या मतदारासंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'रोड शो'ला शनिवारी उत्साहात सुरूवात झाली.

Rahul Gandhi in Varanasi for campaigning for Ajay Rai | अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी वाराणसीत

अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी वाराणसीत

ऑनलाइन टीम

वाराणसी, दि. १० - सर्व देशाचे लक्ष लागलेल्या वाराणसीतील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असून या मतदारासंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'रोड शो' ला शनिवारी उत्साहात सुरूवात झाली. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वाराणसीतील गोल गड्डा भागातून रोड शो सुरू झाला. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत अजय राय यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. ज्या मार्गावरून राहुल गांधी यांच्या गाड्यांचा ताफा जाणार आहे त्या मार्गावर दोन्ही बाजूने काँग्रेस समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे.
वाराणसीतील लढत प्रतिष्ठेची असून काँग्रेसच्या अजय राय यांच्याविरोधात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदींनी गुरूवारी तर केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे रोड शो केला होता.
दरम्यान भाजपने या रोड शोबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वाराणसीतील ज्या भागात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना रोड शो घेण्यास परवानगी नाकारण्यात आली, तेथेच रोड शोसाठी  राहुल गांधीना परवानगी कशी मिळाली असा प्रश्न भाजप नेते अरूण जेटली यांनी विचारला. 
 

 

Web Title: Rahul Gandhi in Varanasi for campaigning for Ajay Rai