शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पंतप्रधान मोदी 'अशा'प्रकारे अडवाणींचा अपमान करतात; राहुल गांधींनी पोस्ट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 12:33 PM

अडवाणींच्या अपमानाचा व्हिडीओ राहुल गांधींनी पोस्ट केला

नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान करतात, अशी टीका राहुल यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. यामध्ये मोदी पंतप्रधान होण्याआधी आणि नंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी कसे वागले, हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. आपल्या गुरुंचा आणि पक्षातील ज्येष्ठांचा अपमान करुन पंतप्रधान आपल्या संस्कृतीचं जतन करत आहेत, असा टोला राहुल यांनी लगावला आहे. 'एकलव्यानं त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदक्षिणा दिली होती. मात्र भाजपामध्ये स्वत:च्या गुरुंना बाजूला केलं जातं. वाजपेयीजी, अडवाणीजी, जसवंत सिंगजी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करुन पंतप्रधान भारतीय संस्कृतीचं जतन करत आहेत,' असा चिमटा राहुल गांधींनी काढला आहे. आज सकाळी राहुल यांनी हे ट्विट केलं. त्याआधी काल राहुल गांधी मुंबईत होते. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतानाही राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना भाजपामध्ये ज्येष्ठांचा अपमान होत असल्याचं म्हटलं होतं. 

'लालकृष्ण अडवाणी मोदींचे गुरु आहेत. मात्र मोदी त्यांचाही आदर करत नाहीत, हे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आलं आहे. काँग्रेसनं अडवाणींना भाजपापेक्षा अधिक आदर दिला,' असं राहुल म्हणाले. भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना सन्मान दिला जात नाही, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला. 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र ते भाजपाचे असूनही मी त्यांचा आदर करतो. कारण त्यांनी या देशाचे नेतृत्व करल्यानं ते देशाचे नेते ठरतात. त्यामुळेच मी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हीच काँग्रेसची संस्कृती आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधी अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहांवर शरसंधान साधलं होतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMumbaiमुंबईAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीTwitterट्विटरAmit Shahअमित शाह