Join us  

'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 9:01 AM

सारंग साठेबद्दल सलील कुलकर्णी म्हणाले...

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' (Naach Ga Ghuma) सिनेमाची सध्या सगळीकडेच हवा आहे. सिनेमाबाबतीत प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिक्रिया येत आहेत. अगदी प्रत्येक शो हा हाऊसफुल सुरु आहे. नम्रता आवटे आणि मुक्ता बर्वेने अप्रतिम काम केल्याची दाद प्रेक्षक देत आहेत. सेलिब्रिटीही या घुमाचे चाहते झालेत. संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे.

सलील कुलकर्णी यांनी  (Saleel KulkarniP) सिनेमा पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया इन्स्टाग्रामवर शेअर केली. ते लिहितात, "नाच ग घुमा...मस्त आहे. आवडला...परेश मोकाशी या माझ्या मित्राचा विनोदाचा हा पोत खास आहे...विरळा आहे..!!

जसं शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुफी संगीत, गझल, रॉक, Jazz.. या प्रकारांना दाद द्यायला तो प्रकार समजून दाद देतात....तशी सरसकट एकच चष्मा लावून सगळे चित्रपट , नाटकं, किंवा माणसं पण बघता येत नाही..हा चित्रपट पाहताना वृत्ती, प्रवृत्ती आणि सभोवताल ह्याचे खूप सूक्ष्म संदर्भ येतात...त्यातून विनोद निर्माण होतो...त्यासाठी ब्लॅक कॉमेडी , caricature, उपहास, अतिशयोक्ती हे सगळं समजूनच त्याकडे बघता आलं तर मजा येते..मुक्ता बर्वे ही आमची मैत्रीण सातत्याने स्वतः ला नवे नवे चॅलेंज देते आणि लीलया ते पारही करते. नम्रता संभेरावने तिच्या पहिल्याच मोठ्या भूमिकेत षटकार मारला आहे..या चित्रपटानंतर नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील..आणि ज्याला त्याच्या कॉलेज वयापासून रंगमंचावर पाहिलं आहे त्या sarang Sathye ने संपूर्ण स्त्री प्रधान चित्रपटात सुद्धा त्याच्या अभिनयाने कमाल केली आहे त्याच्याही तारखा मिळणं दिग्दर्शकांना नजीकच्या भविष्यकाळात अवघड होईल हे नक्की..आमचा मित्र सुनील अभ्यंकर ने धमाल केली आहे आणि छोट्या मायराने लक्ष वेधून घेतलं..तन्मय नरेंद्र भिडे ने या लहान वयात एका चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी पेलली यासाठी त्याच्या बाबाचा मित्र म्हणून मला खूप खूप कौतुक वाटलं.

'नाच गं घुमा' १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. घराघरात असणाऱ्या मदतनीस म्हणजेच कामवाली बाई आणि मालकिणीच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. सध्या मराठी सिनेमांचं भरभरुन कौतुक होतंय. मराठी सिनेमांना अच्छे दिन आलेत असं म्हणायला हरकत नाही.

टॅग्स :सलील कुलकर्णीमराठी चित्रपटनम्रता आवटे संभेरावमराठी अभिनेता