शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी 1 कोटींची कमाई, हातात 55 हजार रोख अन्..; जाणून घ्या राहुल गांधींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 22:10 IST

राहुल गांधींनी बुधवारी वायनाड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती समोर आली आहे.

Rahul Gandhi Net Worth:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून राहुल गांधी यांची संपत्तीची माहिती समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी दरवर्षी 1 कोटींहून अधिकची कमाई करतात. 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचे वार्षिक उत्पन्न 1,02,78,680 रुपये होते, तर 21-22 मध्ये 1,31,04,970 कोटी रुपये होते. सध्या राहुल यांच्याकडे 55,000 रुपये रोख आहेत. 

4 कोटींहून अधिक किमतीचे शेअर्सराहुल यांच्या बँक खात्यात 26,25,157 रुपये जमा आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे केवळ 55 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे यंग इंडियनचे 1900 शेअर्स आहेत, ज्यांची किंमत 100 रुपये प्रति शेअर आहे. याशिवाय त्यांच्याकडे 4,33,60,519 रुपयांचे इतर कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांनी म्युच्युअल फंडात 3,81,33,572 रुपये आणि गोल्ड बाँडमध्ये 15,21,740 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासोबतच पोस्ट ऑफिस आणि विमा पॉलिसींमध्ये 61,52,426 रुपये गुंतवले आहेत. राहुल यांची एकूण जंगम मालमत्ता 9,24,59,264 रुपयांची आहे.

11 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता राहुल गांधी यांच्याकडे 11,15,02,598 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच, त्यांच्यावर 49,79,184 रुपयांचे कर्जही आहे. यासोबतच त्यांच्या नावावर दिल्लीतील मेहरौली येथे दोन शेतजमिनी आहेत. ही जमीन त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे. या जमिनीची सध्याची किंमत 2,10,13,598 रुपये आहे. राहुल यांच्याकडे स्वतःचे घर नाही, पण गुरुग्राममध्ये 9 कोटी रुपयांच्या दोन व्यावसायिक इमारती आहेत

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४