शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:30 IST

सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे.

नवी दिल्लीः लडाखजवळ चीन अन् भारत आमनेसामने आल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना हल्लाबोल केला आहे. सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले आहे की, प्रत्येकास सीमेचे वास्तव माहीत आहे, पण तुमच्या मनाच्या आनंदासाठी ‘शाह-यद’ हा विचार चांगला आहे. 

बिहारमध्ये एका रॅलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते की, भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्त्राईलनंतर संपूर्ण जग सहमत आहे की इतर कोणताही देश आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असेल तर तो भारत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे हे विधान ट्विटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी कविता लिहिली. त्या कवितेतून त्यांनी अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे. 

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान सीमा विवाद सुरू आहे. सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आलेले आहेत आणि दोन्ही बाजूंकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बैठकांच्या फे-या झाल्या. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वादासंदर्भात गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. अलीकडेच त्यांनी असा प्रश्न केला होता की, कोणतेही चिनी सैनिक भारतीय हद्दीत शिरले नाहीत, याची खात्री सरकार करू शकेल का?
चिनी सैन्य युद्धाच्या तयारीत व्यस्त
भारत-चीन सीमा विवाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी मुत्सद्दीपणाचा आणि वाटाघाटीचा मार्ग निवडला असला तरी चिनी सैन्य सतत युद्धाच्या तयारीत व्यस्त आहे. तिबेट सीमेवर युद्धाचा सराव केल्यानंतर आता चिनी सैन्याने देखील चीनच्या वायव्य भागात डोंगरावर लढा देण्यासाठी युद्ध सराव केला आहे. चीनची अधिकृत मीडिया सातत्याने चिनी सैनिकी युद्धाचे व्हिडिओ शेअर करीत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी