शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

राफेल सौद्याचा गुंता लवकरच सुटेल डेसॉल्टला आशा : विमानांच्या किमतीत बदल नाही

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

बेंगळुरू : फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्रातील नामवंत डेसॉल्ट कंपनीने भारतासोबत १० अब्ज डॉलरच्या बहुप्रतीक्षित राफेल विमानांच्या सौद्याचा गुंता लवकरच सुटण्याची आशा व्यक्त केली आहे. या लढाऊ विमानांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नसून विनंती प्रस्तावातील अटींवर आम्ही कायम असल्याचे या कंपनीच्यावतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.

बेंगळुरू : फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्रातील नामवंत डेसॉल्ट कंपनीने भारतासोबत १० अब्ज डॉलरच्या बहुप्रतीक्षित राफेल विमानांच्या सौद्याचा गुंता लवकरच सुटण्याची आशा व्यक्त केली आहे. या लढाऊ विमानांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नसून विनंती प्रस्तावातील अटींवर आम्ही कायम असल्याचे या कंपनीच्यावतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
याबाबत दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांनी डिसेंबरमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार या कंपनीची उच्चाधिकार चमू भारतात पोहोचली असून ती चर्चा पुढे सुरू ठेवणार आहे. किमतीचा मुद्दा अगदी स्पष्ट असून निविदेनुसार कमीतकमी बोली लावतानाच(एलआय) आम्ही पहिल्या दिवसांपासून किमत कायम ठेवली आहे. किमतीच्या आघाडीवर कोणताही बदल केलेला नसेल, असे डेसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रेपियर यांनी सांगितले. भारताच्या एचएएल या सरकारी कंपनीद्वारे १०८ लढाऊ विमानांची निर्मिती केली जाणार असून त्याला हमी देण्यास डेसॉल्ट इच्छुक नसल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. आम्ही विनंती प्रस्तावातील (आरएफपी) उत्तरावर ठाम आहोत. त्यामुळेच भारताने राफेलची निवड केली असल्याचे त्यांनी नमूद केले. ते येथे एअरो इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आले आहेत.
-------------------------
इजिप्तसोबत महागडा करार
भारताला विक्री होणाऱ्या १२६ राफेल विमानांसाठी आकारण्यात आलेली १० अब्ज डॉलरची किंमत पाहता डेसॉल्टने याच आठवड्यात इजिप्तला २४ राफेल विमाने पुरविण्यासाठी केलेला ५.९ अब्ज डॉलरचा सौदा हा कितीतरी पट जास्त किमतीचा आहे. यापूर्वी हमी शर्ती आणि किमतीतील वाढीमुळे फ्रान्ससोबतच्या करारात अडचणी येत असल्याचा दावा भारतीय संरक्षण दलाच्या सूत्रांनी केला होता. आरपीएफचे पालन केले तर हा सौदा लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो; मात्र चेंडू फ्रान्सच्या कोर्टात आहे, असेही सूत्रांनी म्हटले होते. इजिप्तसोबत २४ विमाने, युद्धनौका आणि युद्धसामग्रीबाबत करार झाल्याबद्दल कोणत्या बातम्या प्रसिद्ध झाल्या याचा विचार केला जाऊ नये. त्यात केवळ विमाने नाहीत. २०१२ मध्ये डेसॉल्टची पहिल्यांदा निवड केली तेव्हा या कंपनीकडून आयात करणारा भारत हा पहिला देश बनला होता. प्रत्येक देशाची चर्चेची पद्धत वेगवेगळी असते. इजिप्तच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याची आमची क्षमता आहे. आम्ही दीर्घकाळपासून भारताचे वायुदल आणि सरकाशी कटिबद्ध आहोत, असेही नेपियर यांनी स्पष्ट केले.