अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

नागपूर : भारताचे माजी पंतप्रधान, प्रखर वक्ते, आपल्या शब्दाशब्दातून सूर्य पेरणारे कवी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर डॉ. नारायण खेकाळे यांनी चरित्रग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ दोन खंडात प्रकाशित करण्यात येणार आहे. या दोन्ही खंडाचे प्रकाशन वाजपेयी यांच्या वाढदिवशी २५ डिसेंबरला वसंतराव देशपांडे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकाशित होणार आहे. कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहे. हे दोन्ही ग्रंथ मराठीत असून, प्रकाशन स्थळी सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संजय भेंडे, प्रभाकर येवले, चंदन गोस्वामी उपस्थित होते.

Publication of Charitragrantha on Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन

गपूर : भारताचे माजी पंतप्रधान, प्रखर वक्ते, आपल्या शब्दाशब्दातून सूर्य पेरणारे कवी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर डॉ. नारायण खेकाळे यांनी चरित्रग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ दोन खंडात प्रकाशित करण्यात येणार आहे. या दोन्ही खंडाचे प्रकाशन वाजपेयी यांच्या वाढदिवशी २५ डिसेंबरला वसंतराव देशपांडे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकाशित होणार आहे. कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहे. हे दोन्ही ग्रंथ मराठीत असून, प्रकाशन स्थळी सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संजय भेंडे, प्रभाकर येवले, चंदन गोस्वामी उपस्थित होते.

Web Title: Publication of Charitragrantha on Atal Bihari Vajpayee