दक्षिणच्या तीन गावांसाठी दोन लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद, चार ठिकाणी बसविणार हातपंप

By Admin | Updated: August 14, 2015 00:32 IST2015-08-14T00:32:59+5:302015-08-14T00:32:59+5:30

दक्षिण सोलापूर :

Provision of two lakh funds from the District Planning Committee for three villages in the south, handpumps to be set up in four places | दक्षिणच्या तीन गावांसाठी दोन लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद, चार ठिकाणी बसविणार हातपंप

दक्षिणच्या तीन गावांसाठी दोन लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद, चार ठिकाणी बसविणार हातपंप

्षिण सोलापूर :
तालुक्यातील आहेरवाडी, इंगळगी, सावतखेड या गावांत चार ठिकाणी विंधन विहिरी व हातपंप बसविण्यासाठी २ लाख चार हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
पाऊस लांबल्याने सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मतदारसंघातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नयेत गावातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत लहान लहान कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे पत्र जिल्हा नियोजन समितीला दिले होते. या पत्राची दखल घेत आणि गावातील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन २ लाख ४ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आहेरवाडी येथील ग्रामपंचायत जागेतील इंदिरानगर झोपडप˜ीमध्ये विंधन विहीर घेणे, हातपंप बसविणे, इंगळगी येथील ग्रामपंचायत जागेत हनुमान मंदिराजवळ विंधन विहीर घेऊन या ठिकाणीही हातपंप बसविण्यात येणार आहे.
सवतखेड येथेही ग्रामपंचायत जागेत लक्ष्मी मंदिराजवळ विंधन विहीर घेऊन हातपंप बसविण्यासाठी ५१ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्याचे पत्र आ. देशमुख यांना प्राप्त झाले असून, तत्काळ याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे या गावातील नागरिकांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Provision of two lakh funds from the District Planning Committee for three villages in the south, handpumps to be set up in four places