शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान समर्थकांना गोळ्या घालण्याची कायद्यात तरतूद करा, भाजपा मंत्र्याची मुक्ताफळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 11:27 IST

B. C. Patil : पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा

ठळक मुद्दे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा,देशद्रोह्यांना गोळ्या झाडण्याची तरतूद असलेला केंद्रीय कायदा लागू झाला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणारगेल्या आठवड्यात सीएए-एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी अमूल्या लिओना नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन गोंधळ उडवून दिला होता

बंगळुरू -  काही दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसींच्या सभेत अमूल्या लिओना या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा, असे विधान कर्नाटकसरकारमधील मंत्री बी.सी. पाटील यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात आपण मोदींना आवाहनही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यास अशी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यासाठी एक केंद्रीय कायदा असावा, असे बीसी पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात विचारणा केली असता बीसी पाटील म्हणाले की, ''केंद्र सरकारने देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तरतूद असणारा कायदा केला पाहिजे. देशद्रोह्यांना गोळ्या झाडण्याची तरतूद असलेला केंद्रीय कायदा लागू झाला पाहिजे, असे आवाहन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार आहे.''गेल्या आठवड्यात सीएए-एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी अमूल्या लिओना नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन गोंधळ उडवून दिला होता. या सभेला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसी यांनी अमूल्या हिच्या घोषणाबाजीला विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. तसेच तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बीसी पाटील यांनी अशा लोकांना त्वरित गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे.   केंद्रीय मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनीही देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची दयामाया दाखावली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.   

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटकGovernmentसरकारPoliticsराजकारणPakistanपाकिस्तान