नवी दिल्ली : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध बाजू मांडणारे सरकारी वकील पक्षपाती असल्याचा आरोप करीत खटल्याला स्थगिती देण्याची विनंती द्रमुकचे नेते के. अन्बाझगन यांनी याचिकेत केली असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ९ मार्चपर्यंत लांबणीवर टाकली आहे.कर्नाटक उच्च न्यायालयात जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी खटला सुरू आहे. या याचिकेवर आम्ही अद्याप विचार केलेला नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने सुनावणी लांबणीवर टाकली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}