शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:31 IST

Priyanka Gandhi: पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? प्रियंका गांधींचा प्रश्न

Priyanka Gandhi on Manipur: गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. शनिवारी रात्री मेतेई संघटनेच्या नेत्या अरामबाई टेंगोल आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. निदर्शकांनी रस्त्यांवर उतरुन बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला असून, पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, आता या हिंसाचारावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मणिपूरबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. एका ट्विटमध्ये प्रियांका गांधी यांनी लिहिले की, मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील जनता हिंसाचार, खून, बलात्कार आणि स्थलांतराला तोंड देत आहे. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, हजारो लोक बेघर आहेत. केंद्राचे राज्य असूनही तिथे शांतता प्रस्थापित होत नसल्याचे कारण काय? पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

आजपर्यंत पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत, राज्याच्या कोणत्याही प्रतिनिधीला भेटले नाहीत, कधीही शांततेचे आवाहन केले नाही किंवा कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. ही असंवेदनशील आणि बेजबाबदार वृत्ती कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. देशवासीयांना शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. यापासून मागे हटणे म्हणजे कर्तव्यापासून दूर जाणे होय, अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. 

२०२३ पासून संघर्ष सुरू
मणिपूरमध्ये २०२३ पाहून तीव्र संघर्ष पेटला आहे. एका रिपोर्टनुसार, या संघर्षात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. मणिपूर विधानसभेत ६० जागा आहेत, त्यापैकी एक जागा अजूनही रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत ३२ मेइतेई आमदार, तीन मणिपुरी मुस्लिम आमदार आणि नऊ नागा आमदार आहेत. त्यांची एकूण संख्या ४४ आहे. याशिवाय काँग्रेसकडे पाच मेइतेई जागा आहेत, तर उर्वरित १० आमदार कुकी आहेत, ज्यात भाजपचे सात बंडखोर, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन आणि एक अपक्ष आहे. तुम्हाला सांगतो की मेइतेई गट मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्याचा आग्रह धरत आहे, तर कुकी-झो प्रतिनिधी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र प्रशासनाची मागणी करत आहेत. त्यामुळे मे २०२३ पासून तणाव सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस