अनंत अंबानींच्या लग्नात प्रियांका गांधी गेल्या? निशिकांत दुबे यांनी लोकसभेत केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:11 IST2024-08-07T13:10:09+5:302024-08-07T13:11:05+5:30

आदेश रावल - नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या विवाह समारंभाला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी ...

Priyanka Gandhi attended Anant Ambani's wedding? Nishikant Dubey made a claim in the Lok Sabha | अनंत अंबानींच्या लग्नात प्रियांका गांधी गेल्या? निशिकांत दुबे यांनी लोकसभेत केला दावा

अनंत अंबानींच्या लग्नात प्रियांका गांधी गेल्या? निशिकांत दुबे यांनी लोकसभेत केला दावा

आदेश रावल -

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या विवाह समारंभाला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या का? यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मंगळवारी लोकसभेत संघर्ष झाला.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत सांगितले की, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या अनंत अंबानी यांच्या लग्नाला गेल्या होत्या. प्रियांका गांधी या संसदेच्या सदस्य नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल इथे चर्चा करू नये, असे सांगत सभागृहात या मुद्द्याला विरोध झाला.

निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सभागृहात सांगितले की, भाजप खासदार निशिकांत दुबे नेहमी संसदेत खोटे बोलतात आणि त्यांना कोणीही अडवत नाही.

भाजप खासदाराचा दावा फेटाळून लावत काँग्रेसने म्हटले की, अनंत अंबानींच्या लग्नाच्या वेळी प्रियांका गांधी परदेशात होत्या. भाजपचा हा खोटा आरोप विशेषाधिकार प्रस्तावांतर्गत येतो. तो संसदेच्या रेकॉर्डमधून हटवला नाही तर निशिकांत दुबे यांच्याविरोधात काँग्रेस विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे.
 

Web Title: Priyanka Gandhi attended Anant Ambani's wedding? Nishikant Dubey made a claim in the Lok Sabha