शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी आदेशावरून ८० हजार शाळांतील शिक्षक विकताहेत गोण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 06:24 IST

बिहारमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

कटिहार (बिहार) : दरमहिन्याचे वेतन मिळावे म्हणून सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुहम्मद तमिझुद्दीन हे गेल्या जुलै महिन्यापासून रोज सकाळी डोक्यावर रिकामी पोती स्थानिक बाजारात विकायला नेतात. तमिझुद्दीन हे कडवा तालुक्यात नोकरीला असून त्यांनी सरकारची प्रतिमा डागाळली म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अनेक वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यामुळे तमिझुद्दीन यांच्या आवाजात शक्ती असून ते कडवा बाजारात १० रुपयाला एक पोते, असे मोठ्याने ओरडून विकतात. पोते विकले नाही तर मला वेतन मिळणार नाही, असे ते ग्राहकांना सांगतात. लोक ही पोती घेत नाहीत कारण या पोत्यांना उंदरांनी भोके पाडलेली असतात किंवा ती फाटलेली तरी असतात. तमिझुद्दीन यांना अजून एकही पोते विकता आलेले नाही. शाळेचा मुख्याध्यापक बाजारात पोते विकतो हे येणाऱ्या-जाणाऱ्याला बघायला विचित्र वाटते. तमिझुद्दीन यांच्यासह बिहारमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांचे ८० हजार शिक्षक व मुख्याध्यापक म्हणतात की, आम्ही राज्य सरकारने दिलेल्या आदेशांचे फक्त पालन करीत आहोत. तमिझुद्दीन यांनी स्वत:च्या गळ्यात छोटी पाटी लटकवलेली असते. त्यावर “मी बिहारमधील शाळेत शिक्षक असून सरकारच्या आदेशांनुसार मी रिकामी पोती विकत आहे”, असे त्यावर लिहिलेले असते. नितीश कुमार सरकारने सगळ्या शाळांच्या माध्यान्ह भोजन योजनेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना त्यांच्या भागांतील शाळांनी ही पोती विकायची आहेत, असे सांगितले आहे. या पोत्यांतून या शाळांना तांदूळ आणि डाळीचा पुरवठा केला गेला होता. माध्यान्ह भोजन योजनेचे संचालक सतीश चंद्र झा यांनी २२ जुलै रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, धान्याची रिकामी पोती विकली जात नसल्यामुळे राज्य सरकारला खर्च करावा लागत असल्याचे पाटण्यातील महालेखा कार्यालयाच्या लक्षात आले आहे. ही पोती १० रुपयांना एक याप्रमाणे विकून त्याची नोंद माध्यान्ह भोजन योजनेच्या हिशोब पुस्तकात केली जावी, असेही त्यात म्हटले. १२.७ कोटी रुपये अपेक्षित२०१४-२०१५ पासून ३८ जिल्ह्यांत माध्यान्य भोजन योजनेत किती धान्य व किती पोती पाठविली गेली याची यादी पत्रासोबत दिली आहे.  त्यानुसार एकूण १.२७ कोटींपेक्षा जास्त पोती असून त्यातून १२.७ कोटी सरकारला अपेक्षित आहेत.